शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा पूूल ‘रामभरोसे’

By admin | Updated: October 27, 2016 03:37 IST

महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते.

- हितेन नाईक,  पालघरमहाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई-गुजरातला जोडणारा ब्रिटिशकालीन वैतरणा पूलाचे शेवटचे स्ट्रकचरल आॅडिट कधी झालेय याची माहितीच पश्चिम रेल्वे प्रशासना कडे उपलब्ध नसल्याने महाड च्या दुर्घटने नंतर तात्काळ आॅडिट होणे गरजेचे असताना रेल्वे प्रशासन त्या दृष्टीने पावले उचलत नसल्याने प्रवाशांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन किती बेफिकीरिने वागत आहे हे दिसून येत आहे.मुंबई-गुजरात-दिल्ली आदी राज्यांना जोडणारा सफाळे-वैतरणा पूल पश्चिम रेल्वे साठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहे.ब्रिटिशकालीन काळात सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या ९२ व ९३ क्र मांकाच्या पुलाची उन्हातान्हात समुद्राच्या लाटाचा मारा आणि पुलावरून होणारी रोजची वाहतुकीच्या भारा मुळे धोकादायक अवस्था झाली आहे. ह्या पुलांच्या बांधकामातील लोखंडी साहित्य गंजून गेले असून धोकादायक अवस्थेतील या पुलांचे आयुष्यमान कमी असल्याने रेल्वे प्रशासनाने सात वर्षा पूर्वी पासून नवीन रेल्वे पूल उभारणीचे काम हाती घेतले आहे.मात्र रेल्वे आणि ठेकेदारा मध्ये समन्वयाचा अभाव असल्याने रेल्वे पूल उभारणीचे काम जवळपास बंद पडले आहे.पालघर-डहाणूला उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्या नंतर लोकल वाहतूक सुरु झाली असून लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत आहेत. अशा वेळी नवीन पूल उभारणी ला मोठी दिरंगाई होत असल्याने आणि या पुला जवळूनच मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असल्याने प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. महाड मध्ये झालेल्या दुर्घटने नंतर या पूल उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरु करणे अत्यावश्यक असताना त्या नवीन पुलाच्या उभारणीचे काम बंद पडत असल्यास प्रवाशांच्या जीविताचे गांभीर्य रेल्वे प्रशासनाला किती आहे हे दिसून येत असल्याचे राहुल तोडणकर या प्रवाशाने सांगितले. रोजची वाहतूक पहाता एक दिवस मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.माहितीच्या अधिकारामध्ये धक्कादायक वास्तव- पालघर जिल्हा निर्मिती नंतर नागरीकरणाचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून मेल, एक्स्प्रेस, शटल, मेमु द्वारे लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. तसेच अवजड माल वाहतूकही सुरु असल्याने हा जीर्ण झालेला पूल किती वेळ ह्या वाहतुकीचा भर सांभाळू शकेल हा प्रश्न उपस्थित झाल्या नंतर डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेचे सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश प्रभुतेंडोलकर ह्यांनी पश्चिम रेल्वे प्रशासना कडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती.या अर्जाला सफाळे-वैतरणा दरम्यानच्या दोन्ही पुलाच्या स्ट्रक्चरलं आॅडिट कधी झाली आहे. ह्या बाबत माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर प्रथमेश ह्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाल्या नंतर मोठा मेगाब्लॉक घेऊन थोडीशी दुरु स्ती करण्यात आली होती. परंतु रेल्वे पुलाच्या पूर्वे कडील भराव हि खचत असल्याच्या घटना नेहमी समोर येत आहेत.या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरलं आॅडिट तात्काळ करणे अत्यावश्यक बाब असताना अजूनही त्याबाबत रेल्वे प्रशासन ढिम्म बसली असल्याने रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीविताशी जीवघेणा खेळ खेळत असून त्यांना कुठलेही गाम्भीर्य दिसून येत नसल्याचे दिसून येत नसल्याने दैनंदिन प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.