शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

सूर्या-वैतरणा झाल्या आक्रमक

By admin | Updated: August 13, 2016 03:53 IST

चहाडे, सफाळे इ, भागातून वाहणाऱ्या सूर्य-वैतरणा नदीच्या लगत राहणाऱ्या स्थानिकांना एकेकाळी सोन्यासारख्या बागायती क्षेत्रासह रेती उत्खननाद्वारे वैभवसंपन्न बनवले.

- हितेन नाईक, पालघर

पालघर : चहाडे, सफाळे इ, भागातून वाहणाऱ्या सूर्य-वैतरणा नदीच्या लगत राहणाऱ्या स्थानिकांना एकेकाळी सोन्यासारख्या बागायती क्षेत्रासह रेती उत्खननाद्वारे वैभवसंपन्न बनवले. मात्र अधिक पैशांच्या हव्यासापोटी त्याच नदीचे पात्र आणि खोलीचे नैसर्गिक स्तोत्र संक्शन पंपाच्या साहाय्याने ओरबाडून काढण्याचे काम काहींनी केल्याने बागायती जमिनी, लोकोपयोगी बांधकामे धडाधड नदीच्या पात्रात कोसळत आहेत. पालघर जिल्ह्यातील बहाडोली, खामलोली, धुकटन, दिहसर, पारगाव, सोनावे, चहाडे, विश्रामपूर, वसरे, हालोली, कुडे, दारशेत,घाटीम, कांदरवन, माकने, वेढी, मासवन, नागझरी, वंदिवली, हमरापूर, आदी अनेक गावांशेजारून वाहणाऱ्या सूर्या-वैतरणा नदीमध्ये बारमाही उपलब्ध असणाऱ्या पाण्यामुळे इथला स्थानिक शेतकरी भातशेतीसह वाल, हरभरा, तूर, सुरासन, तिळ हे द्विदल धान्याचे पीक घेत होते. निसर्गसंपन्न अशा या क्षेत्रातील लोक मर्यादित अशा आर्थिक स्तोत्राची अपेक्षा बाळगून आपला व्यवसाय सांभाळीत अगदी आनंदात आणि समाधानात जगत होते. पालघर, डहाणू भागाला उपनगराचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर नागरिकीकरणाचा वेग हळूहळू वाढू लागला. त्यामुळे पालघर, विरार, वसई, बोईसर, डहाणू, वाणगाव इ. भागात मोठमोठी हिवासी संकुले उभी राहू लागली. यांना रेती आणि विटांची गरज भासू लागल्यानंतर रेतीची मागणी वाढू लागली. याच दरम्यान, सन १९९९च्या सुमारास वैतरणा-सूर्या नदीत रेतीचे मुबलक साठे असल्याचे आढळून आल्यानंतर इथल्या आर्थिक अर्थकारणाने मोठी उसळी घेतली.भातशेती, बागायती क्षेत्रात राबणारे हात नदीपात्रातील रेती शोधण्यासाठी नदीत उतरले. प्रथम डुबी पद्धतीने रेती काढणाऱ्या स्थानिकांचे हातरेतीच्या अधिक मागणीमुळे विनाशकारी संक्शन पम्पाकडे वळू लागले आणि बक्कळ पैसा मिळू लागल्याने स्थानिकांची हाव वाढत गेली आणि काही अधिकाऱ्यांच्या छुप्या सहकार्याने नदीला ओरबडण्यास सुरु वात झाली. काही स्थानिकांच्या डोळ्यात पैशांची नशा एवढी चढली होती की, या संक्शन पंपाच्या विनाशकारी पद्धतीमुळे आपल्या जमिनी धडाधड नदीपात्रात कधी कोसळून त्यात विरघळून गेल्या, याचे भान ही त्यांना राहिलेच नाही. स्थानिकांच्या जमिनी, मोठमोठे वृक्षासह शासनाच्या निधीतून उभारलेली बहुउद्देशीय बांधकामे नदीपात्रात कोसळू लागली आहेत. सावित्रीच्या घटनेनंतर प्रशासनाला जागमहाड येथील सावित्री नदीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मात्र राज्य शासनासह रेल्वे प्रशासनाचे डोळे खडबडून जागे झाले आणि जिल्हाधिकारी नि आपल्या अधिकारात फौजदारी प्रक्रि या संहिता कलम १४४ अन्वये(२), (२)व (३) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ३० व ३४ अन्वये रेल्वेच्या वैतरणा पूल क्र .९२ आणि ९३ नंबरच्या पुलाच्या आजूबाजूचा ६०० मीटर्सचा भाग धोकादायक म्हणून निषिद्ध क्षेत्र जाहीर करून या रेल्वे पुलाच्या खालून नौकानयन करण्यास बोटींना मज्जाव करण्यात आल्याचे आदेश त्यांना काढावे लागले. आता तरी जिल्हाधिकाऱ्यांनी नुसतेच आदेश काढण्यापुरता मर्यादित न राहता माफियांना त्यांना छुपा पाठिंबा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रभावीपणे कडक कारवाई करणे गरजेचे आहे.रेल्वे पुलासह वाढीव गावाला धोकाआपल्यावर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्याची दृढ भावना बेकायदेशीररीत्या उत्खनन करणाऱ्याच्या मनात वाढीस लागली आणि अति पैशांच्या हव्यासापोटी स्थानिकांचे हात वैतरणा नदीवरील रेल्वे पुलाजवळील निषिद्ध क्षेत्रालगत मिळणाऱ्या रेतीकडे पोहचू लागले. या बेकायदेशीर रेती उत्खननामुळे रेल्वे पुलासह वाढीव गावाला धोका पोहचू लागल्याच्या तक्र ारी वाढू लागल्या. लोकमतनेही या विरोधात प्रशासनाला अनेक वेळा धोक्याचा इशाराही दिला होता.मात्र महसूल विभाग आपल्याकडे कारवाई करण्यासाठी बोटी नसल्याचे कारणे देत टाळाटाळ करीत होते.माझ्या जमिनीत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्याविरोधात मी सन २०१५ पासून पालघर तहसीलदाराकडे लेखी तक्र ार केली आहे. मात्र त्यांच्यावर अजूनही कारवाई होत नाही. - गुलाब किणी, खामलोली.बेकायदेशीर रेती उत्खननामुळे नदीपात्र वाढून जमिनी कोसळत आहेत. या वाहतुकीविरोधात मी २१ नोव्हेंबर २०१५ पासून तहसीलदाराकडे तक्र ार करीत आहे, मात्र कारवाई होत नाही. - दिनेश डगला, सरपंच, खामलोली.तक्रारींना केराची टोपली :खामलोली ग्रामपंचायत, स्थानिक महिलांनी याविरोधात सन २०१५ पासून जिल्हाधिकारीपासून तहसीलदार, पोलिसांकडे तक्रारी केल्या. मात्र, हप्तेबाजीमुळे यांच्या तक्रारींना केराच्या टोपल्या दाखवण्यात आल्याचे स्थानिक महिला यांनी लोकमतला सांगितले.