शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हळद लागवडीच्या अपयशावर तोडगा!

By admin | Updated: August 30, 2015 21:28 IST

वास्तविक भातशेती ही पावसाळी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या ही परवडेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यायी पीक म्हणून हळद लागवडीचा प्रयोग

वास्तविक भातशेती ही पावसाळी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या ही परवडेनाशी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्यायी पीक म्हणून हळद लागवडीचा प्रयोग करण्यात आला होता. सुरुवातीस त्यास स्थानिक शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. परंतु कालांतराने ही लागवड परवडत नसल्याचे स्पष्ट करून अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. कृषी विभागाने या मागची कारणे शोधायला हवीत.शेतकऱ्यांना ही लागवड का परवडत नाही, या प्रश्नाच्या खोलात जाऊन तपासणी झाली पाहिजे. या लागवडीचा प्रारंभ करताना या बाबींचा विचार झाला होता का? शेतकऱ्यांना माफक दरात बी-बियाणे पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन राहिले का? हळद लागवडीला भातशेतीपेक्षा अधिक खर्च येतो का? हळदीचे ब्रँडींग व मार्केटींग का फसले? या प्रश्नाची उत्तरे कृषी विभागाकडून अपेक्षित आहेत. भातशेती स्थानिक शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून कृषी विभागाने कालबद्ध कृषी कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गावातील नारळावर गेल्या १० वर्षांपासून जीवघेण्या रोगांचे थैमान सुरु आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे आपल्या कृषी विभागाला आजतागायत शक्य झाले नाही. ज्या तामीळनाडू व केरळ राज्यातून या रोगाचे आगमन झाले. त्या राज्यांनी मात्र अल्पावधीत या रोगाचा समूळ नायनाट केला व शेतकऱ्यांना दिलासा दिला. या राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर हे साध्य करून दाखवले, ते आपल्या कृषी अधिकाऱ्यांना जमू शकले नाही. त्यामुळे नारळाची जिल्ह्यातून हद्दपारीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. हळद लागवडीची अशीच हालत निर्माण होणार का? याचे उत्तर मिळाले पाहिजे.पालघर तालुक्यातील केळवे-माहिम या परीसरात काही बागायतदार मसाल्याचे पदार्थ व व्हॅनिला लागवडीचे प्रयोग करीत असतात. अशा बागायतदारांना शासनस्तरावरून प्रोत्साहन मिळाल्यास बागायतक्षेत्राला पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतील. समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये बागायती लागवडीला पोषक हवामान असताना कृषी विभाग अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे स्थानिक बागायतदार व शेतकरीही पुढाकार घेत नाहीत. तांदुळ, केळी, पानवेली व आता हळद अशी जर मालिका वाढतच जाणार असेल तर मग ग्रामीण भागातील भूमीपुत्रांच्या मुलाबाळांना रोजगारासाठी शहरे गाठावी लागतील व ती प्रक्रीया गेल्या १० वर्षांपासून सुरु झाली आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागाने पालघर डहाणू, जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा व विक्रमगड भागातील भातशेती व बागायती वाचवण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, तसेच कमी पाण्यात व खर्चात तयार होणारे पर्यायी पीकेही कोणती? ते शोधून त्यांची लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच जिल्ह्यातील उरली-सुरली शेती, बागायती वाचू शकेल. तसेच रोजगारासाठी होणारे स्थलांतरही थांबेल.