शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

थंडीत रंगू लागल्या पोपटीच्या पार्ट्या

By admin | Updated: January 8, 2017 02:34 IST

सद्यस्थितीत संध्याकाळच्या वेळी जर विक्रमगड व परिसरातील ग्रामीण भागातून जात असाल तर त्यावेळी विशिष्ट पोपटीच्या वासाने(अर्थात हुरडा पार्टी) तेथेच पाय थबकतात़ पोपटीचा

- राहुल वाडेकर,  विक्रमगडसद्यस्थितीत संध्याकाळच्या वेळी जर विक्रमगड व परिसरातील ग्रामीण भागातून जात असाल तर त्यावेळी विशिष्ट पोपटीच्या वासाने(अर्थात हुरडा पार्टी) तेथेच पाय थबकतात़ पोपटीचा वास कधीही लपून राहत नाही ़सध्या या हंगामध्ये गुलाबी थंडी व बाजारासह येथील प्रत्येक शेतक-यांचे वाडीवर वालाच्या,तुरीच्या व पावटेवाल,चवळी आदींच्या शेंगा उपलब्ध होत असल्याने या परिसरात पोपटी लावण्याचे प्रमाण आजही खुप मोठे आहे़ त्यामुळे ही पोपटीची चव याकाळामध्ये चिभेवर रेंगाळल्या शिवाय राहात नाहीक़ाही ठिकाणी याला हुरडा पार्टी असेही संबोधतात तर काही ठिकाणी पोपटी यानावाने प्रसिध्द आहे़आता हे खादय सर्वानाच आवडीचे झाल्यानेत्याची बाजारात दुकानावर विक्री देखील होवुन लागली आहे़बाजारात किंवा आठवडा बाजारात वाल,पावटयाच्या व तुरीच्या शेंगा दाखल होत असून त्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्राहकांबरोबरच शहरी भागातील ग्राहकांची मोठयाप्रमाणात गर्दी होते़विकमगड तालुक्यातील कावळे, उटावली, शेलपाडा, विक्रमगड,ओंदे, झडपोली, आपटी, माण, आदीं ठिकाणी वाल, पावटा,तुर व चवळी आदी खरेदी करण्यासाठी ग्राहक येत असतात़ विक्रमगड तालुक्यातील कडवे वाल हे सर्वत्र प्रसिध्द आहेत ग़्रामीण भागात येणा-या शहरी पाहुण्यांचे स्वागत मुखत्वे या सीजनमध्ये पोपटीच्या पाहुणचाराने केले जाते़या पोपटीची चव सतत जिभेवर रेंगाळत असल्यामुळे पाहुणे मंडळीही पोपटीचा आस्वाद, पाहुचार घेण्यासाठी सतत आतुरलेले असतात़ साधारणपणे डिसेंबर ते एप्रिल पर्यत याचा हंगाम असतो़वालाच्या शेंगा, पावटयाच्या शेंगा व तुरीच्या शेंगा सायंकाळीच्या मोकळया वेळेत घरातही फक्त मिठ टाकून उकडल्या जातात. त्या अतिशय स्वादिष्ट लागतात़ अशी बनवा पोपटी़.़.पोपटी बनविण्यासाठी प्रथम मडके घेउन त्यात सर्व बाजूस भाम्बुर्ड्याची पाने ठेवली जातात़ त्यावर वाल पावटयांच्या शेंगाचा थर, त्यानंतर ओवा, चवीपुरते मीठ टाकले जाते़ पोपटी ही शाकाहारी असेल तर त्यात बीट, रताळे, वांगी, कांदे, बटाटे आदी टाकले जातात, जर पोपटी मांसाहारी असेल तर मटण, चिकन, अंडी, मीठ मसाला लावून मडक्यात टाकतात व त्यावर पुन्हा शेंगाचा थर घालून भाम्बुर्ड्याचा पाला टाकून मडक्याचे तोंड बंद केले जाते़ मडक्यातील हवा ही बाहेर येऊ नये म्हणून मडक्याच्या तोंडाशी माती लावली जाते़ पोपटीचे मडके हे पेढयांच्या गवतामध्ये ठेऊन ते पेटविले जाते़ त्याच्या वाफेवरच ही पोपटी शिजते़ ही प्रक्रिया सुरु असतानाच खमंग वासानेच भूक लागते़ पंधरा-वीस मिनिटे हे मडके आगीत ठेवतात नंतर या मडक्यावर पाण्याचा शिडकाव करुन पोपटी तयार झाली की नाही याची खात्री करतात़ पोपटीच्या सुटणा-या खमंग वासानेच पोपटी शिजली की नाही याची कल्पना येते. अशा प्रकारे तयार केलेली पोपटी विकून अथवा ती बनवून देण्याचा व्यवसाय या हंगामामध्ये केल्यास चांगले अर्थाजन होऊ शकते. सध्या पोपटीचा वापर हा गेटटुगेदरसाठी होउ लागला आहे़बबन दामोदर सांबरे, ओंदे