शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा-टॅक्सीची नोंदणी रद्द करण्यासाठी यापुढे फिटनेस पीयूसी, इन्शुरन्स यांची गरज भासणार नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:02 IST

आरटीओ ने यापूर्वी वाहन नोंदणी रद्द  करण्यासाठी घेतलेले  पैसे परत करणार का ? विजय खेतलेंचा सवाल

आशिष राणे, वसई            ‌   रिक्षा-टॅक्सीची नोंदणी रद्द करण्यासाठी यापुढे फिटनेस पीयूसी, इन्शुरन्स यांची गरज भासणार नाही असे परिपत्रक परिवहन आयुक्त यांनी काढले आहे मग आरटीओ ने यापूर्वी वाहन नोंदणी रद्द  करण्यासाठी घेतलेले पैसे ते परत करणार का ? असा सणसणीत सवाल  रिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी विचारला आहे .

मोटार वाहन कायद्यातील तरतुदींप्रमाणे जर एखादी रिक्षा व टॅक्सी चालविण्यात योग्य नसेल अथवा आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसेल तर तिची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे, त्यानुसार संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयाकडे अर्ज करून त्या वाहनाची नोंदणी करण्याची तरतूद आहे.याकरता यापूर्वी राज्यातील सर्वच उपप्रादेशिक व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी लिपिक हे त्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विमा व वायु प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, यांची मागणी करत असतात.

मात्र मोटर वाहन कायद्यात हे सर्व घेण्याची ची तरतूद करण्यात नाही. तथा त्यांच्याकडून दंड वा त्यासाठी तडजोड शुल्क घेण्याचेही ही कायद्यात नाहीआता याबाबत परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य लक्ष्मण दराडे यांनी दि.17 डिसेंबर 2020 रोजी एक परिपत्रक काढून यापुढे रिक्षा टॅक्सी याची नोंदणी रद्द करताना फिटनेस, इन्शुरन्स, पीयूसी, यांची मागणी करू नये असे बजावले आहे.तसेच त्यांच्याकडून दंड व तडजोड रक्कम ही घेऊ नये असे परिपत्रकात म्हटले आहे.

मात्र यापूर्वी वरील कारणांसाठी संबंधित प्रादेशिक उपप्रादेशिक कार्यालयात हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांचे घेतलेले पैसे त्यांना परत मिळतील का ?  असा प्रश्न आता ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी उपस्थित केला आहे .अर्थात च या प्रति प्रश्नाने परिवहन आयुक्त अडचणीत व कोंडीत सापडले आहेत.

काय आहेत परिवहन आयुक्त कार्यालयांच्या तरतुदीमोटर वाहन अधिनियम,1988 च्या कलम 55 मध्ये वाहन मालकाने वाहन आर्थिक दृष्ट्या परवाडण्यापलीकडे नादुरूस्त झाल्यास या वापरास कायमस्वरूपी असम हे हेर्थ ठरल्यास त्याचे असे वाहन नोंदणी रद्द (निर्लेखित) करण्याबाबत तरतूद आहे. अशा बाबतीत मालकाने नोंदणी प्राधिकारी यांच्याकडे वाहन नोंदणी प्रमाणपत्र पाठविणे आवश्यक आहे अशा अशयाची तरतूद आहे.

2. राज्य परिवहन प्राधिकरण ठराव क्र. 07/2013 नुसार टॅक्सीच्या तसेच ठराव क्र.17/2020, दि.25.09.2020 नुसार ऑटोरिक्षाच्या वयोमर्यादेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून वाहन मालकाने वाहनाची वयोमर्यादा पूर्ण झाल्यामुळे अथवा त्यापूर्वीच वाहन आर्थिक दृष्टया परवडण्यापलीकडे  नादुरूस्त झाल्यास त्याचे वाहन नोंदणी रद्द (निर्लेखित) करण्याबाबत परिवहन कार्यालयातस्वेच्छेने अर्ज केला असता, त्याचेकडून सदर वाहनाने वैध विमा प्रमाणपत्र सादर करण्याबाबत आग्रह धरण्यात येतो.

3.) वाहन निर्लेखित करतेवळी वैध विमा प्रमाणपत्र  योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सद्यस्थितीस मोटर वाहन कायदा व नियमांत कोणतीही तरतूद नाही. तसेच वाहन वापरण्यायोग्य नसल्याने त्याची आवश्यकता सुद्धा नाही.

4. सबब, उक्त वाहन वापरास कायमस्वरूपी असमर्थ ठरल्यास असे वाहन निर्लेखित करतेवेळी वाहन मालकाकडून वैध विमा प्रमाणपत्र योग्यता प्रमाणपत्र  व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र  सादर करण्याचा आग्रह  धरण्यात येऊ नये अथवा त्यासाठी दंडाची/ तडजोड शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये, तथापी, मोटार वाहन कर, पर्यावरण कर ,इत्यादी थकीत कर वसूल करण्यात यावा .मात्र सदर वाहन कागदपत्रांची वैधता संपली असताना रस्त्यावर चालताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करावी.अशा तरतुदी आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस