शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

राष्ट्रीय पेयजलच्या नळपाणी योजना अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:57 IST

मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे.

संजय नेवेविक्रमगड : तालुक्याला मार्चनंतरच्या पाणीबाणीपासून मुक्त करण्यासाठी तीन वर्षांपासून राष्टÑीय पेयजल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली येथील पाच ते सहा नळपाणी योजनेचे काम सुरु आहे. त्यात विहिरीचे काम झाले असून पाण्याच्या टाक्यांचे क ाम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. मात्र, यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या कायम असल्याने ही कामे कधी पुर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या योजनांची कामे ग्रामपंचायतस्तरावर झालेल्या असून यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. ही कामे वर्क आॅर्डर प्रमाणे केव्हाच पुर्ण व्हायला हव्या होत्या. मात्र, त्या कोणत्या टप्प्यावर आडल्या आहेत याचा अभ्यास ना जि.प.कडून होत ना त्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडून होत. याबाबत पाणीपुरवठाविभागाचे उप अभियंता आर. कदम यांना विचारणा केली असता या योजनांवर पुर्वी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत कामे झाली आहेत. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्या पूर्ण होत नसल्याने त्यांचे हस्तातंरण पाणी पुरवठा विभागाला करुन त्या पूर्ण करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले. परंतू हे कधी होणार याबाबत काहीच सागितले नाही.अशा योजना आखल्या जातात पंरतु प्रत्यक्षात त्याचा लाभ गाव खेडयाना होतो की नाही हे कोणीच पाहत नाही. त्यामुळे या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसे वीज बिलान मुळेही तलवाडा, कुज या व अशा योजना बंद आहेत. या बाबतही पाणीपुरवठा विभागने लक्ष देऊन या सर्व योजना कार्यान्यित कराव्या अशी मागणी कॉ. किरण गहला यांनी केली आहे. तालुक्यात दरवर्षी ३५ ते ४० गाव पाडाना पाणी टंचाई जाणवते. या वर्षी तिच परिस्थिती निर्माण होत आहे. तरी पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन टंचाई दुर करावी व टँकरची व्यवस्था करावी विहिरीची पातळी कमी झालेल्या असून यावर उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात अशी मागणी गहला यांनी केली आहे.>जनाठेपाड्यात टॅँकरने व टाक्यांद्वारे पाणीपुरवठा सुरुतलवाडा: ओंदे ग्रुपग्रामपंचात अंतर्गत असलेल्या जनाठेपाडयात भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत होता. येथे ६० ते ७० घराची वस्ती आहे. ६५० ते ७०० लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते.जनाठे पाडा विक्र मगड शहरा पासुन केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. जनाठेपाडा उंच भागात वसलेला आहे. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली असून. त्यामुळे मार्चपासूनच या पाड्यात तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे.या बाबत पंचायत समिती अधिकाऱ्यांन कडे तक्र ार करून ही प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करण्यात आली नव्हती या बाबत लोकमतमध्ये जनाठेपाडयात तीव्र पाणी टँचाई या मंथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर दखल घेत या पाड्यात टाक्यांनद्वारे व टँकर द्वारे पाणी पुरवठाची सोय सुरु केली आहे.त्याचप्रमाने ग्रुप ग्रामपंचात ओंदेच्या सरपंच चंद्रकला खुताडे यानी माहिती देताना सांगितले की, उन्हाळा संपे पर्यंत उघाणीपाड्यातून तातपुरता पाईप लाईनद्वारे जानाठेपाडा येथील रहिवाशाना पाण्याची सोय करून देण्यात आली आहे.दरवर्षी या पाड्याला पाणी टंचाई जाणवते. प्रशासनाने यावर अपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजना त्वरीत पूर्ण करून पाणी टंचाईवर कायमची उपाय योजना करावी.- सुनील विष्णू कनोजा, ग्रामस्थ, जनाठेपाडाजनाठेपाड्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीत टॅँकर व टाक्यांद्वारे पाणी सोडले जात आहे.