जव्हार : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणारी बहुसंख्याही आदिवासी लोकवस्ती आहे. पालघर जिल्ह्याला पेसा कायदा लागू असल्याने, या भागात काम करणारे अधिकारी हे मराठी बोलणारेच असावेत, अशी मागणी येथील स्थानिक आदिवासी वगार्ची. मात्र जव्हार येथे उप वनसंरक्षक कार्यालयात ६ महिन्यांपासून रुजू झालेले, उप वनसंरक्षक- श्रीदास शिवबाला हे मुळचे पश्चिम बंगाल येथील, असल्यामुळे ते कार्यालयात बंगाली व इंग्रजीच भाषा बोलत आहेत.या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांनी आपल्या रोजगार व इतर अडचणी मांडायच्या कुणाकडे असा प्रश्न पडला आहे. मराठी भाषा बोलता येत नसलेल्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस वाडा, व आरपीआय, युवा जिल्हाध्यक्ष पालघर, यांनी वनमंत्री- सुधीर मुंनगटीवार यांच्या कडे केली आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, सायवन, खोडाळा येथील वन क्षेत्रपाल हे जव्हार उप वनसंरक्षक यांच्या कार्यालया अंतर्गत येत आहेत. या भागातून अनेक आदिवासी नागरिकांच्या रोजगारा संबंधी किव्हा इतर तक्रारी येत आहेत. परंतु या उप वनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्याला मराठी भाषा बोलता व मराठी भाषा कळत नसल्याने, कुणशी काय बोलायाचे अशी समस्या निर्माण झाली आहे. या भागातील आदिवासी लोकांना इंग्रजी बोलता येत नसल्याने, आपण त्या अधिकाऱ्यां समोर जावून उपयोग तरी काय असा प्रश्न पडला आहे. (वार्ताहर)
जव्हार उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना मराठी भाषेचे वावडे
By admin | Updated: February 6, 2016 02:03 IST