Vidhan sabha 2019 : ठाकूर कुटुंबीयांनी दाखल केले वसई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:53 PM2019-10-01T23:53:55+5:302019-10-01T23:54:56+5:30

बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा तसेच नालासोपाऱ्याचे विद्यमान आ. क्षीतिज ठाकूर आणि यांनी वसई विधान सभेसाठी मंगळवारी दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Maharashtra Vidhan sabha 2019: Thakur family files nomination for Vasai constituency | Vidhan sabha 2019 : ठाकूर कुटुंबीयांनी दाखल केले वसई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज

Vidhan sabha 2019 : ठाकूर कुटुंबीयांनी दाखल केले वसई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज

googlenewsNext

वसई : बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा तसेच नालासोपाऱ्याचे विद्यमान आ. क्षीतिज ठाकूर आणि यांनी वसई विधान सभेसाठी मंगळवारी दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, या तिघांनीही अर्ज दाखल केल्याने वसईसाठी आघाडीचा नेमका उमेदवार कोण हे मात्र ७ आॅक्टोबरपर्यंत गुलदस्त्यातच राहणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, शेवटच्या घटकेला आपल्या उमेदवाराचे अर्ज दाखल करून विरोधकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाºया बहुजन विकास आघाडीने आज आधीच अर्ज दाखल करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी मोठ्या संख्येने बविआचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षीतिज ठाकूर आणि माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
 

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: Thakur family files nomination for Vasai constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.