शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

गत वर्षात महाराष्ट्रात ८८ पत्रकारांवर हल्ले

By admin | Updated: January 9, 2017 06:15 IST

पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून

विक्रमगड : पत्रकारांसाठी २०१६ हे वर्ष सर्वात वाईट, धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या ७९ घटना घडल्या असून यामध्ये ८८ पत्रकार जखमी झाले आहेत. सरासरी दर चार दिवसाला राज्यात एका पत्रकारावर हल्ला झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे संकलित झालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. १ जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१६ या पाच वर्षांच्या काळात राज्यात ३४१ पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. हे प्रमाण अन्य कोणत्याही राज्यांच्या तुलनेत जास्त आणि चिंता वाटावी एवढे आहे. आणखी किती पत्रकारांची डोकी फुटल्यावर सरकार पत्रकार संरक्षण कायदा करणार आहे? असा सवाल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केला आहे. २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यात ८८ पत्रकार जखमी तर झाले आहेतच त्याचबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पत्रकारांना धमक्या देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या २४ घटना घडलेल्या आहेत. शिवाय पत्रकारांवर अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंग, खंडणी, सारखे गंभीर आणि अजामिनपात्र खोटे गुन्हे दाखल करण्याच्या २२ घटना घडल्या आहेत. याच कालावधीत एका पत्रकाराचे अपहरण झाले असून त्याची नोंद पोलिसात झालेली आहे. वेगवेगळ्या कारणांनी ६ पत्रकारांनी आत्महत्या केल्या असून १४ पत्रकारांचे अकाली निधन झाले आहे. माध्यमातील या सर्व घटना माध्यमात काम करणाऱ्यसाठी चिंता वाढविणाऱ्या आहेत.समितीने २०१२ पासूनची आकडेवारी दिलेली आहे. २०१२ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या ४५ घटना घडल्या. २०१३ मध्ये त्यात मोठीच वाढ होऊन ती संख्या ६५ पर्यंत पोहोचली. २०१४ मध्ये पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले नाही. उलट ते वाढले. २०१४ मध्ये ६६ पत्रकारांवर हल्ले झाले. २०१५ मध्ये हा आकडा आणखी वाढला आणि हल्ल्यांची संख्या ७७ वर पोहोचली तर २०१६ मध्ये ८८ पत्रकार जखमी झाले. (वार्ताहर)