शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

लाकडी नांगराकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2015 22:11 IST

पावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात, खेड्यापाड्यांत डोळ्यांसमोर उभी राहते हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज

शशिकांत ठाकूर  कासापावसाळा आला म्हणजे ग्रामीण भागात, खेड्यापाड्यांत डोळ्यांसमोर उभी राहते हिरवीगार शेती, शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी, पण आजच्या आधुनिक युगात ही बैलांची नांगरणी थांबली असून त्याऐवजी शेतकरी पॉवर टिलरच्या वापराला प्राधान्य देतांना दिसत आहेत.खेड्यापाड्यांतील शेतकरी म्हटले म्हणजे त्यांच्याकडे डौलदार बैलांची जोडी, लाकडी नांगराच्या एक-दोन जोड्या, ही असणारच, असा समज. एकदा जून महिना उजाडला की, जमीन मशागतीसाठी नांगर दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे, एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे, नवीन बैल खरेदी करणे, किंवा भाड्याने बैल आणणे, नांगरासाठी व चिखलणीस लागणाऱ्या फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे, अशा कामांची शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. नांगर मजबूत, टिकाऊ असावा, यासाठी शेतकरी साग, शिसव, खैर यासारख्या वृक्षांच्या लाकडांचा वापर करतात.ग्रामीण भागातील शेतकरी आता मशागतीच्या कामासाठी पॉवर टिलर वापरू लागले आहेत. लाकडी नांगराऐवजी पॉवर टिलरचा वापर केल्याने शेतकऱ्यांचा वेळ, पैसा तसेच शारीरिक श्रमदेखील वाचतात. साधारणपणे पॉवर टिलर दोन तासांत एक हेक्टर जमीन नांगरतो. त्यामुळे नांगराच्या तुलनेत कमीतकमी वेळात जास्त जमीन नांगरली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी, नांगरणी, पेरणी आदी कामांसाठी एकमेकांच्या शेतात जाऊन मदत करीत असत. परंतु, आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमितपणा यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे रोपणी, पेरणी लवकर करण्याचा प्रयत्न करतात. पॉवर टिलर भाड्याने घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३०० रु. प्रतितास या भावाने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बरेच शेतकरी शेतीच्या कामासाठी लाकडी नांगराऐवजी काम पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर वापरत आहेत.