शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आता पालिका कार्यक्षेत्रातील कोव्हिड रुग्णालय निहाय रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 15:53 IST

CoronaVirus News : जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या या आदेशानुसार आता जिल्ह्यात रेमडेसिवर इंजेक्शनचे केंद्रीय व रुग्णालय निहाय पद्धतीने वाटप केले जाणार आहे.

- आशिष राणे

वसई : पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाकडून आता वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोव्हिड रुग्णालयांना केंद्र निहाय रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती वसई विरार वैद्यकीय आरोग्य विभागाच्यावतीने आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी 'लोकमत'ला दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या या आदेशानुसार आता जिल्ह्यात रेमडेसिवर इंजेक्शनचे केंद्रीय व रुग्णालय निहाय पद्धतीने वाटप केले जाणार आहे.

वैद्यकीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये रेमडेसिवर इंजेक्शनचे वाटप हे केंद्रीय पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या सक्रीय रुग्णांच्या आकडेवारीनुसार यापुढे संबंधित त्या -त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी रेमडेसिवर इंजेक्शनचे वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर, जिल्हा पालघर कार्यालयाकडून दि.17 एप्रिल, 2021 रोजी निघालेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ‘फक्त खाजगी’ (DCHC/DCH) रुग्णालय निहाय रेमडेसिवर इंजेक्शन पुरवठ्याबाबत वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सविस्तर माहिती सादर करण्यात आली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशान्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर, जिल्हा पालघर कार्यालयाकडून वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोव्हिड रुग्णालय निहाय रेमडेसिवर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास सुरुवात झाल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या