शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वर्ग १२, विद्यार्थी ४१६ अन ७ शिक्षक

By admin | Updated: July 27, 2016 03:14 IST

विक्रमगडे तालुका हा पालघर जिल्ह्यातील डोंगरी तालुका म्हणून ओळखला जात असून येथील बहुल आदिवासी समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासावर कागदोपत्री कोट्यावधीचा निधी

- राहुल वाडेकर, विक्रमगड

विक्रमगडे तालुका हा पालघर जिल्ह्यातील डोंगरी तालुका म्हणून ओळखला जात असून येथील बहुल आदिवासी समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासावर कागदोपत्री कोट्यावधीचा निधी खर्ची पडत असलातरी येथील जि.पच्या केंद्र शाळेत शिक्षणाचे समिकरणच बिघडल्याचे चित्र दिसत आहे. वर्ग १२,विद्यार्थी ४१६ आणि शिक्षक अवघे ७ अशी येथील मांडणी असून या विद्यार्थ्यांना अध्यापन कसे होत असेल हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.तालुक्यामध्ये २३७ जिल्हापरिषद शाळा असून त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांची गळती थांबावी यासाठी शासनाने द्विशिक्षकी धोरण राबविले असले तरी काही शाळांवर पटसंख्या जास्त असतांनाही तेथे शिक्षकांची संख्या कमी आहे. तसेच ज्या ठिकाणी एकच शिक्षकाची गरज आहे. तेथे दोन शिक्षक आहेत. मात्र, विक्रमगडच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये इयत्ता पहिली ते ८ वी पर्यंत व पहिली ते ४ थी सेमी इंग्रजी माध्यम शाळा असे १२ वर्ग मिळुण एकूण ४१६ विदयार्थी शिक्षण घेत आहे़ मात्र, त्यांना अध्यापणाचे काम करणारे शिक्षक अवघे ७ असल्याने ते मुलांना अध्यापण कसे करणार अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने या शाळांवरील शिक्षकांना कामाचा अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे़विक्रमगड जिल्हा परिषद केंद्र शाळा ही १९०७ पासुन कार्यरत असुन आज मितीस या शाळेस तब्बल १०० वर्षे पुर्ण झाली आहेत़ या केंद्राशाळेमध्ये अवघे ९ शिक्षक देण्यात आलेले आहेत़ त्यामध्ये एक शिक्षक हा कायम गैरहजर व एक मुख्याध्यापक आहेत. त्यामुळे अध्यापण करणारे फक्त ७ शिक्षक आहेत़ त्यातच शिक्षकांवर शिकविण्या व्यतिरिक्त इतरही अनेक कामांचा बोजा टाकण्यात आल्याने मोठी अडचण निर्माण होत असते़ हा उपाय ठरु शकतो...कमी शिक्षक असल्याने उपलब्ध शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने शिक्षण विभागाने या समस्यांकडे गांर्भीयाने पाहून ज्या शाळांची पटसंख्या कमी आहे व त्याठिकाणी दोन दोन अगर तिन तिन शिक्षकांची आवश्यकता नाही त्या शाळांवरील शिक्षकांना ज्या ठिकाणी जास्त पटसंख्या आहे व कमी शिक्षक आहेत त्या ठिकाणी वर्ग केल्यास हा प्रश्न आपोआपच मिटणार आहे़ याबाबत केंद्रशाळेच्या शाळाव्यवस्थापण समितीने तसा ठराव करुन विक्रमगडच्या केंंद्रशाळेमध्ये शिक्षकांची कमतरता भरुन काढणेबाबतचे पत्र देखील शिक्षण विभगास दिलेले असल्याचे समजते परंतु त्यावर काही उपाय योजना झालेली दिसण्यात आलेली नाही़विक्रमगडची केंद्र शाळा ही तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाते़ या शाळेमध्ये गावातील सर्वच विदयार्थी शिक्षण घेत असल्याने शिक्षकांची कमरता भरुन काढणे गरजेचे आहे. त्यासाठी मी पाठपुराव करत आहे.- प्रशांत भानुशाली, सदस्य, शाळा व्यवस्थापण समितीतालुक्यातील २४ शाळांची पटसंख्या २० हुन कमी आहे. त्यातच जर शिक्षकांची कमरता भासत असेल तर अजुनही इतर शाळांची पटसंख्या कमी होऊन विद्यार्थ्यांची गळती थांबविणे कठीण होईल. त्या करीता त्वरीत यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे़- केतन पटेल, ग्रामस्थ विक्रमगड