शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन

By admin | Updated: February 22, 2017 00:46 IST

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले.

जलयुक्त शिवार अभियान : २०१६-१७ मध्ये २१४ गावांची निवड प्रशांत हेलोंडे   वर्धा सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले. आता २०१६-१७ साठी या अभियानात ‘यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प’ राबविला जात आहे. यंदा २१४ गावांची निवड करण्यात आली असून ३३ गावांतील विविध कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीही आताच गावांची निवड करण्यात येणार आहे. सिंचनासह पिण्यायोग्य पाण्याच्या साठ्यात वाढ करणे, हे उद्दिष्ट यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे आहे. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ मध्ये कृषी विभागाकडून २१३ गावांतील कामे हाती घेण्यात आली होती. यातील २ हजार ९९३ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ४०० कामे प्रलंबित राहिली होती. यातील निधी प्राप्त झाल्यामुळे २०० कामे सुरू झाली आहेत. यात ढाळीचे बांध बाधणे, नाला खोलीकरण आदी कामांचा समावे आहे. शिवाय याच अभियानांतर्गत ‘एरीया ट्रीटमेंट’ची कामेही करण्यात आली. सुमारे ५८ हजार १०७ हेक्टरवर ही कामे करण्यात आलीत. यात पाणी रोखून जमिनीत मुरविले जाते. या पद्धतीमुळे माती वाहून जात नाही. परिणामी, जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. गतवर्षी नाला खोलीकरणाची ५२७ कामे झाली. यात ११० किमीपर्यंत सुमारे ९६६० सहस्त्र घनमीटर पाणी साठविण्यात आले आहे. धरणे, प्रकल्प जेथे पोहोचू शकत नाही, अशा गावांची निवड करून हे अभियान राबविले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानसाठी निवडलेल्या गावात सर्व कामे पूर्ण झाली पाहिजे, या उद्देशाने कृषी विभागाकडून कामे केली जात आहेत. जुन्या सिमेंटच्या नाला बांधाच्या ठिकाणी खोलीकरणाच्या कामांना यात प्राधान्य दिले जात आहे. २५३ जुन्या नाला बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यासाठी महात्मा फुले जलभूमी अभियानाचा निधी वापरण्यात आला आहे. गतवर्षी झालेल्या या कामांमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सिंचन क्षेत्रात वाढ झाली. आता २०१६-१७ मध्ये २१४ गावांमध्ये विविध कामे सुरू करण्यात आलीत. यातील यशोदा नदीच्या काठावरील गावांत ३३ कामे सुरू करण्यात येणार आहे. खोलीकरणासह ढाळीचे बांध बांधले जाणार असून मृत जलस्त्रोत जिवंत करण्यात येणार आहे. खोलीकरणाची ३६३ कामे करण्यात येणार असून यासाठी बजाज फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार आहे. उगम ते संगम पद्धतीने यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे नदी काठावरील तसेच काही किमी अंतरातील पाण्याची पातळी वाढणार आहे. परिणामी, सिंचन क्षमतेतही वाढ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानमुळे शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. खरीप तसेच रबी हंगामातील पिकांनाही याद्वारे जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळेच यंदा रबी हंगामातील पीक क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. यावर्षीची कामे पूर्ण झाल्यानंतर सिंचन क्षमतेत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शिवाय यशोदा नदी पुनर्जीवन प्रकल्पामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईची समस्याही मार्गी लागणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.