वातावरणातील बदलामुळे साथरोग बळावले : शासकीय व खासगी रुग्णालये फुल्लश्रेया केने वर्धापावसाने मारलेल्या दडीमुळे एकीकडे शेतपिकांचे नुकसान होत आहे. तर जिल्ह्यात आरोग्य विषयक समस्यांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे. वातावरणातील दमटपणा विषाणूंच्या वाढीस पोषक असल्याने साथरोग बळावत आहे. याचा बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होवून रुग्णालयात येणाऱ्या बालरुग्णांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. या वातावरणामळे चिमुकल्यांना सर्दी, खोकला, ताप, उलटी, हगवण या सारख्या आजारांनी ग्रासल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह सामान्य रुग्णालयातील बाह्य विभाग व शहरातील खासगी रुग्णालयातील संख्या वाढली आहे. अशात जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना तासणतास रांगेत उभे रहावे लागत आहे. पाऊस गडप झाल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. हा काळ डासांच्या पैदासीला पोषक असल्याने साथरोग बळावण्याचा धोका उद्भवत आहे. यातच या बदलेल्या वातावरणामुळे विषाणुजन्य आजारांची भर पडत आहे. असलेल्या वातावरणामुळे दिसणारे लक्षण डेंग्युची पहिली पायरी आहे. रुग्णात दिसत असलेली लक्षणे वेळीच आटोक्यात आली नाही तर ती धोक्याची ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दूषित पाण्याने रोगास निमंत्रणसध्या जलस्त्रोतात पाणी नव्याने येते. यामुळे पोटाचे विकार उद्भवतात. पाण्याचे शुद्धीकरण होेणे खूपच महत्त्वाचे आहे. विहीर, हातपंपाचे क्लोरिनेशन आवश्यक आहे. जवळपास ७० टक्के आजार हे दूषित पाण्याच्या सेवनाने होतात. लहान मुलांना शक्यतो उकळलेले पाणी पिण्यास द्यावे. दूषित पाण्याच्या सेवनाने डायरिया, कॉलरा, सर्दी असे आजार उद्भवता. अनेकदा पाईपलाईन लिकेज असल्याने शुद्धीकरण केलेले पाणी दूषित हाते. हेच पाणी सेवन केल्यावर आजराला निमंत्रण देणारे ठरते.डासांच्या पैदासीला पोषक वातावरणपावसाळा सुरू असल्यास जमिनीवर पाणी स्थगित होत नाही. पाणी वाहते असल्यास त्यात डासांची पैदास होत नाही. सद्यास्थितीत असलेले वातावरण डासांच्या उत्पत्तीला पोषक असल्याने डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार डोके वर काढतात. डासांच्या उत्पतीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी केले. घरातील कुलरची टाकी नियमित साफ करणे, छतावरील साहित्य ज्यात पाणी साचणार नाही. ते उबडे घालणे, रिकामे टायर, पिंप यात पाणी साचू न देणे, घरातील खिडक्यांना जाळी लावणे, पाण्याच्या टाकीला झाकण बसविणे, परिसराची स्वच्छता, सेप्टीक टँकला जाळी लावणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर हाच यावर बचावात्मक उपाय आहेत. याचा अवलंब केल्यास बऱ्याच अंशी डासांच्या हल्ल्यापासून वाचता येते. जेवण्यापूर्वी हात धुवावे, जवळपास ८० टक्के आजारांना बळी पडण्यापासून वाचता येते. यामुळे लहान मुलांना साबणाने स्वच्छ हात धुण्याची सवय लावावी.जिल्ह्यात असलेले वातावरण डासांना पोषक असल्याचे समोर आले आहे. यात आरोग्य सेवा जिल्ह्यातील रुग्णालयात तीन जणांना डेंग्येची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात मे महिन्यात दोन तर जून महिन्यात एका रुग्णाचा समावेश आहे. १ एप्रिलपासून जिल्ह्यात नोंद झालेल्या तापाच्या ७३ हजार ९३८ रुग्णांच्या रक्तांवी तपासणी करण्यात आली. यातील १३ जणांना हिवतापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. पावसाने दडी मारल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना डायरिया होत असल्याचे समोर आले आहे. यात मे महिन्यात २६४ तर जून महिन्यात ४५० रुग्णांना डायरिया झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दोन महिन्यात १२ हजार ७३२ रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयात मे व जून या दोन महिन्यात १२ हजार ७३२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात जून मे महिन्यात ६ हजार ४२१ तर जून महिन्यात ६ हजार २६१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने जनजागृती सुरू जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोधक महिना म्हणून पाळण्यात येतो. याकाळात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापासून जनजागृती केली जाते. नागरिकांपर्यंत आजारापासून बचाव करण्याचे उपाय यांची माहिती पोहचविणे मुख्य उद्देश आहे.
जलजन्य आजाराचे थैमान
By admin | Updated: July 15, 2015 02:31 IST