शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मजुरीचे दर कडाडल्याने बळीराजा झाला हवालदिल

By admin | Updated: July 31, 2016 00:43 IST

पावसाने उघाड दिल्याने ठप्प झालेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहे.

आर्थिक भुर्दंड : पावसाआधी शेतातील तण काढणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांची लगबग वर्धा : पावसाने उघाड दिल्याने ठप्प झालेली शेतीची कामे पुन्हा सुरू झाली आहे. पिकांमध्ये वाढलेले तण शेतकऱ्यांकरिता मनस्तापाचे कारण असताना निंदनाच्या खर्चाचा मोठा भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. मजुरीचे दरच कडाडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मृग नक्षत्र सुरू होताच शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व लगेच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटास सामोरे जावे लागले. बसलेला पहिला आर्थिक फटका सहन करीत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. ती पेरणी साधली. पीक उगवले व मशागतीस प्रारंभ झाला. याच दरम्यान सलग आठवडाभर पावसाने हजेरी ठेवली. हा पाऊस पिकांसह वाढलेल्या तणालाही पोषकच ठरला. पिकांपेक्षा तण अधिक झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली व पाऊस थांबण्याची प्रतीक्षा सुरू झाली. ,मध्यंतरी पावसाने केवळ दोन दिवस विश्रांती घेतली. त्या काळात काही शेतकऱ्यांना डवरणाची कामे करता आली. तर इतरांना शेतातील पाणी बाहेर काढता आले. ज्यांना काहीच शक्य झाले नाही. त्यांच्या शेतातील पीक परिस्थिती विदारक आहे. रोज येणाऱ्या पावसाने जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण केला आहे. त्याचा परिणाम पिकांवर होऊन सोयाबीनसह कपाशीचे पीक पिवळे पडले आहे. पावसाने थोडी उघाड दिल्याने शेतकऱ्यांनी आता निंदनाच्या कामाला प्रारंभ केला आहे. पण १०० ते १२० रुपये असलेला महिला मजुराचा रोज आता १५० ते २०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यातही मजुरांना शेतापर्यंत घेऊन येणाऱ्या वाहनांचे भाडेही शेतकऱ्यांनाच द्यावे लागत आहे. मजूर पैशाकरिता थांबत नाही. फवारणीसाठी असलेल्या मजुरांचे दरही वाढले आहे. उघाड असेपर्यंत निंदण वा डवरण आणि खते देण्याचे कआम आटोपणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे मजुरीचे दर कडाडूनही शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसत अआंतरमशागतीची कामे आटिपावी लागत आहे. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे व अतिप्रमाणात वाढलेल्या रानवनस्पतीमुळे निंदनाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यातच वेळीअवेळी पावसाला सुरुवात झाल्यास कामात व्यत्यय येतो व नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.(तालुका प्रतिनिधी) आंतर मशागतीसाठी मजुरांची चणचण आर्वी- पावसाने उघाड दिल्यामुळे आर्वी परिसरात निंदण, डवरणी, फवारणी यासह पिकांना खत देण्याच्या कामांना वेग आला आहे; परंतु शेतातील कामे करण्यासाठी मजुरवर्गच मिळेनासा झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यामुळे अधिक पैसे देवून मजुरांकडून कामे करून घ्यावी लागत आहे. दोन ते तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप थांबली आहे. या काळात होईल तेवढी आंतरमशागत करणे गरजेचे आहे. शेतातील तण पुर्णपणे नाहिसे करणेही आवश्यक झाले आहे. लगेच पाऊस आल्यास पुन्हा तण वाढयाला सुरुवात होणार आहे. यामुळे तण काढून टाकणे आवश्यक आहे. सोबतच रोगांचा प्रादुर्भाव होवू नये याची आताच खबरदारी घेत फवारणी करणेही गरजेचे झाले आहे. पण यासर्व कामांसाठी मजुरच मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे.(शहर प्रतिनिधी)