शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:30 IST

भविष्यात कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, म्हणून आपत्तीजनक परिस्थितीसोबत दोन हात करण्यासाठी प्रत्येकाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

ठळक मुद्देशैलेश नवाल : आपत्ती-धोके व्यवस्थापन दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भविष्यात कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, म्हणून आपत्तीजनक परिस्थितीसोबत दोन हात करण्यासाठी प्रत्येकाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती प्रतिसाद दल- नागपूर, स्थानिक प्रहार समाज जागृती संस्था, राष्ट्रीय छात्र सेना युनिट व वर्धा जिल्हा स्काऊट्स आणि गाईड्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपत्ती-धोके व्यवस्थापन दिन’ या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे उपअधीक्षक सुरेश कराळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक शरद साळुंखे, स्काऊटचे जिल्हा आयुक्त तथा प्रहार संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के, नायब तहसीलदार डॉ. शंकुतला पराजे, पोलीस उपनिरीक्षक इटकर, जिल्हा सचिव रामभाऊ बाचले, शिक्षण विभागाचे अशोक रंगारी, प्राचार्य मदन मोहता, जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, गाईड संघटक वैशाली अवथळे, प्रहार संस्थेचे सचिव संतोष तुरक, प्राचार्य खुशाल मून, प्रा. रविंद्र गुजरकर व क्रीडा व्यवस्थापक रविंद्र काकडे उपस्थित होते.‘आपत्ती-धोके व्यवस्थापन दिन’ कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन आपली जबाबदारी या विषयावर पोस्टर स्पर्धा, निबंध, वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील उजेत्यांना पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले.राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या वतीने आग, पूर व भुकंप आदी परिस्थिती नियंत्रणासंदर्भात प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.एन.सी.सी. छात्र सैनिक, स्काऊट्स आणि गाईड्स व आयटीआय कॉलेजच्या एन.एस.एस. स्वयंसेवकांना रोप क्लाईब्रिग, रबर बोट, घरगुती वस्तूंपासून पुरपरिस्थितीत स्वत:हाचा जीव वाचविण्यासाठी बचाव साहित्य, विविध प्रकारच्या गाठी, प्रथमोपचार व आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली. तसेच नवीन मतदार जनजागृती अभियानाबाबत तालुका नोडल अधिकारी प्रा. गिरीश काळे, नायब तहसीलदार डॉ. शंकुतला पाराजे व सांगळे यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.यावेळी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे उपअधिक्षक सुरेश कराळे व प्रशिक्षक सदस्य तसेच प्रहार संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन मोहन गुजरकर यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाकरिता उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी नवाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर सोनटक्के यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन सतीश इंगोले यांनी तर आभार जिल्हा गाईड संघटक वैशाली अवथळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक दुमे, मोर्ले, झाडे, हरगुडे, एनसीसीचे नायब सुभेदार त्रिलोक सिंग, हवालदार मालू, उर्मिला चौधरी, रेणूका भोयर, स्काऊट कर्मचारी विवेक कहाळे, संजय केवदे, रितेश जयस्वाल, सुषमा कार्लेकर, अंडर आॅफीसर लोभास उघडे, अंडर आॅफीसर संकेत काळे, सार्जेट प्रगती मेलेकर, रोव्हर्स, रेंजर्स, एनसीसी छात्र सैनिक व प्रहार संस्थेचे स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी