शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

‘टायगर’ची वाटचाल दक्षिणेकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:22 IST

चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल होत देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारापर्यंतचा प्रवास करणाऱ्या वाघाचे पाऊल आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने पुढे पडत आहेत. देवळी तालुक्यातील इसापूर शिवारात सदर वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये दहशत : इसापूर येथे आढळले पावलांचे ठसे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल होत देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारापर्यंतचा प्रवास करणाऱ्या वाघाचे पाऊल आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने पुढे पडत आहेत. देवळी तालुक्यातील इसापूर शिवारात सदर वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन पीक काढणीच्या हंगामातच शेतशिवारात वाघाचा मुक्तसंचार होत असल्याने शेतकºयांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे.बुधवारी सदर अडीच वर्षीय वाघाने एकपाळा शेत शिवारात उगेमुगे यांच्या शेतात मुक्काम ठोकून शिकार केलेला बैलावर ताव मारला. त्यानंतर गुरूवारी पहाटेला वाघाने उगेमुगे यांच्या शेतापासून दूर जात सुरक्षीत ठिकाणी विश्रांती घेतल्याचे बोलले जात आहे. तर शनिवारी मध्यरात्री वाघाने पुन्हा विश्रांती घेतलेले आपले सुरक्षीत स्थान सोडून आपल्या हक्काच्या नैसर्गीक अधिवास शोध घेण्यास सुरूवात केल्याने आणि इसापूर शिवारातील महामार्ग ३६१ परिसरात त्याचे काहींना दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी रात्रीपर्यंत देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारात मुक्काम ठोकलेल्या या वाघाच्या पावलाचे ठसे रविवारी पहाटे इसापूर शिवारात आढळून आले आहे. त्याचे वन विभागाच्या अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांनी बारकाईने निरिक्षण केल्यानंतर तो दक्षिण दिशेने वाटचाल करीत असावा असा कयास सध्या बांधल्या जात आहे. त्यामुळे इसापूर शिवारातील आजूबाजूच्या दहा गावांना सतर्कतेचा इशारा वन विभागाच्यावतीने देण्यात आला असून वन विभागाचे अधिकारी कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी गावात जाणून योग्य सूचना देत आहेत.वाघाची ओळख पटविण्यात अद्याप यश नाहीचचंद्रपूर जिल्ह्यातून वरोरा मार्गे देवळी तालुक्यातील इसापूर पर्यंतचा प्रवास पूर्ण करणाºया या अडीच वर्षीय वाघाच्या मागावर सुमारे एक महिना वरोरा येथील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी होते. त्यांच्याकडे असलेल्या या वाघाचे छायाचित्र व वर्धा वन विभागाच्या हाती लागलेले सदर वाघाचे छायाचित्र बघून हा वाघ वरोरा येथून आल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक वाघाला वाईल्ड लाईन विभाग टी-१, टी-२ अशा स्वरूपाचे तात्पूर्ते नाव देतो. परंतु, सदर वाघ कुठला व त्याला पूर्वी काय नाव देण्यात आले होते याबाबतची ओळख पटविण्यात वन विभागाला यश आले नसल्याचे सांगण्यात येते.वाघ नरभक्षम होण्यास अनेक कारणेसुंदरबनातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि खाºयापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील भीमाशंकरच्या जंगलात शतकावर माणसे एका वाघाने मारली होती. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे असून त्यात वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश, काही पुर्वानुभव आदींचा समावेश असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासकांच्या अभ्यासत पुढे आले आहे.दररोज १५ ते २० किमीचा प्रवासकधीकाळी दोन वाघाच्या पाऊल ठशांमध्ये एकरुपता येऊ शकत असली तरी प्रत्येक वाघाच्या अंगावर असलेल्या पट्ट्यांमध्ये कधीही एकरुपता येत नाही. इतकेच नव्हे तर वाघ एका दिवशी सुमारे १५ ते २० किमीचा प्रवास करीत असून एकादा पोटभर शिकारीवर ताव मारल्यावर त्याला कमीत कमी सात दिवसांपर्यंत शिकार करण्याची गरज पडत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.वाघाबाबतची अल्प शब्दातील माहितीवाघ हा मांजर वर्गातील सर्वात मोठा प्राणी असून तो क्रूर शिकारी आहे.भारताला वाघाचे माहेरघर समजले जात असून तो देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे.वाघाच्या अंगावर काळ्या रंगाचे पट्टे राहत असून दोन वाघांच्या अंगावरील पट्टे सुद्धा कधीच समान नसतात.वाघ सुमारे ताशी ६५ किमी या वेगाने पळू शकतो. इतकेच नव्हे तर वाघाचे जबडे त्याच्या पंजाहूून अधिक बलवान असतात.बलवान जबड्याच्या भरवश्यावर तो आपली शिकार घट्ट पकडून ठेवू शकतो. शिवाय इतर ठिकाणी ओढून नेऊ शकतो.वाघ कळपाने राहत नसून तो आपल्या क्षेत्राबाबत अतिशय आक्रमक असतो. वाघ आपल्या जागेवर वाघिणींना राहू देतात; पण दुसऱ्या वाघाचे अस्तित्त्वही त्याला सहन होत नाही.वाघ सहसा एकटे शिकार करीत असून त्याला मोठ्या प्राण्याची शिकार करण्यास आवडते.माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नसून नेहमीच वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकुन एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे.जो वाघ माणसांनाच आपले नेहेमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे संबोधिले जाते.वाघांचा वावर राहणाऱ्या क्षेत्र वाईल्ड लाईफ आणि प्रादेशिक अशा दोन झोन मध्ये मोडतात. प्रत्येक वाघाच्या अंगावर पट्टे राहत असून कुठल्याही दोन वाघांची तुलना या पट्ट्या आधारे केल्यास साम्य राहत नाही.- संजय इंगळे तिगावकर,वन्य जीव अभ्यासक, वर्धा.एनटीसीच्या सूचनेवरून आम्ही प्रतिबंधात्मक उपाय-योजना करीत आहे. शिवाय गावात जावून आमचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत माहिती देत आहेत. सदर वाघ चंद्रपूर जिल्ह्यातून आला असल्याचे आतापर्यंत आम्हाला प्राप्त झालेल्या छायाचित्रावरून स्पष्ट झाले असून त्याला वाईल्ड लाईफ विभागाने दिलेल्या तात्पूर्त्या नावाबाबतची ओळख अद्यापही पटलेली नाही. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता बाळगावी. शिवाय शेत कुंपनात कुठल्याही परिस्थितीत विद्युत प्रवाहित करू नये.- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक, वर्धा.

टॅग्स :Tigerवाघ