शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र नाही

By admin | Updated: October 29, 2016 00:53 IST

दिवाळसण साजरा करण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात निघालेले सोयाबीन वाहनात भरून थेट बाजारात आणण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची लूट सुरूच : गरज नसताना मूग उडिदाचे खरेदी केंद्र; बाजारात आलेल्या सोयाबीनला हमीभावाचीही शाश्वती नाही रूपेश खैरी  वर्धा दिवाळसण साजरा करण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात निघालेले सोयाबीन वाहनात भरून थेट बाजारात आणण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू झाली असून हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी होत आहे. असे असताना जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीन खरेदीचे एकही शासकीय केंद्र सुरू झाले नाही. यामुळे शासनच शेतकऱ्यांची लूट करीत असल्याची ओरड होत आहे. या उलट बाजारात येत नसलेल्या मुंग व उडीद खरेदीकरिता केंद्र सुरू झाले आहे. ज्या कृषी मालाची बाजारात आवक नाही, त्या वणाच्या खरेदीकरिता शासनाचे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रावर दिवसभर शासनाचा कर्मचारी बसून राहतो; मात्र त्याला एक दाणाही मिळत नाही; मात्र गरज असताना शासनाच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यात आले नाही. एकीकडे सोयाबीनची वाढती आवक व दुसरीकडे आवक नसलेल्या शेतमालाची खरेदी करण्याकरिता असलेले केंद्र, हा विरोधाभास शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाची आठवण देणारा ठरत आहे. यातच गत दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी हमीदरापेक्षा कमी दरात सोयाबीनची खरेदी करू नये असे फर्माण काढले. बाजारात सध्या होत असलेली खरेदी व्यापाऱ्यांकडून होत असल्याने त्यांच्याकडून या फर्माणाकडे दुर्लक्ष होणे सहाजिकच आहे. दिवाळीसण दिवसावर आला आहे. यामुळे रात्रभर बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक सुरू आहे. यात सोयाबीन विकून मुला-बाळांना कपडे व घरी काही साहित्य नेण्याच्या इराद्याने शेतकरी बाजारात सोयाबीन आणतो; मात्र येथे त्याच्या लुटीमुळे या दोनपैकी एकच इच्छा पूर्ण करणे शक्य होत आहे. यामुळे निदान हमीभावाकरिता शासकीय खरेदीचे केंद्राची गरज आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच असलेला दर पडणे नित्याचेच झाले. यातच यंदा सोयाबीनचे उत्पन्न वाढणार असल्याचे संकेत आहे. यामुळे बाजारात आवक वाढत आहे. असे असले तरी यंदाची आवक आजच्या घडीला गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या हंगामात गुरुवारपर्यंत २४ हजार क्विंटलची आवक झाली होती. गतवर्षी म्हणजेचे आॅक्टोबर २०१५ मध्ये २९ हजार ८७ क्विंटल सोयाबीन बाजारात आले होते. ही आवक यंदा वाढण्याचे संकेत आहेत. गतवर्षी मिळाला होता ३,७९० रुपयांचा दर गत वर्षी सोयाबीनचे उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला होता. यंदा मात्र हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना अत्यल्प दरात सोयाबीन विकावे लागत असल्याचे चित्र आहे. सन २०१५ च्या खरीप हंगामात ३ हजार ७९० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला होता. तर यदांच्या हंगामात सरासरी २ हजार ८०० रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.