प्राथमिक शाळेत वृद्धाची हजेरी : अपंग विद्यार्थ्याला दररोज पोहोचवावे लागते शाळेतनारायण लोहकरे - भारसवाडाकाही वर्षांपूर्वी आबालवृद्धांकरिता शासनाने साक्षरता अभियान सुरू केले होते़ यानंतर साक्षरतेचे प्रमाण वाढल्याने ते अभियान मागे पडले़ असे असले तरी येथे मात्र ते अभियान शाळेच्या माध्यमातून सुरू असल्याचा भास होतो़ गत तीन वर्षांपासून एक वृद्ध आपल्या नातवासोबत प्राथमिक शाळेत हजेरी लावत असल्याने नातवासोबत त्यांनाही शिक्षणाचे धडे गिरविता येत असल्याचे दिसते़गावातील प्राथमिक शाळेत गत तीन वर्षांपासून शाळेच्या वेळे एक अपंग नातू आणि आजोबा शिक्षण घेत असल्याचे दिसून येते़ नातू हा जन्मत: अपंग असून अत्यंत गरीब घरातील आहे़ यामुळे त्याची त्याचे आजोबा दररोज शाळेत ने-आण करतात़ शिवाय संपूर्ण शाळा संपेपर्यंत त्यांना शाळेतच हजर राहावे लागते़ त्याचप्रमाणे त्याची संपूर्ण घराची व बाहेरील जबाबदारीही आजोबांनाच पार पाडावी लागते़ यामुळे शाळेत शिक्षकांनी जे काही नातवाला शिकविले, ते आजोबांना आपोआपच आत्मसात होत असल्याचे दिसते़ जुनेर नजीर खॉ पठाण हा मुलगा जन्मत: अपंग असल्याने त्याचे आजोबा हुसेन खॉ पठाण त्याला शाळेत घेऊन जातात़ सध्या तो इयत्ता चवथीमध्ये शिक्षण घेत आहे़ मुख्याध्यापक काळे हे त्याला व त्याच्या आजोबांना वेळोवेळी सहकार्य करतात़
नातवासोबत मिळतेय आजोबाला शिक्षण
By admin | Updated: August 29, 2014 00:01 IST