लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव(श्या.पंत) : तळेगाव ते आर्वी मार्गाने प्रवास करणे सध्या नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असून अपूर्ण रस्ता खोदकामामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.वर्षभरापूर्वी तळेगाव ते आर्वी रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली होती. मार्गावरील काही अंतरापर्यंतचा तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला होता. नदी-नाल्यंवरील पूल खचवून पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक वळण मार्गाने वळविण्यात आली होती. पण, रस्ता बांधकाम आणि पुलाचे काम अर्धवट सोडल्याने प्रवासादरम्यान वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.वर्षभरात अनेक दुचाकींसह चारचाकींचे अपघात झाले आहे, अनेकांचे हात-पाय मोडून गंभीर दुखापत झाली आहे.पावसाळा सुरू होणार असून जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यासह पुलाचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात चिखल होत वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुलाच्या बाजूने काढलेल्या वळण रस्त्यावर कोणतेही सूचना फलक व दिशादर्शक फलक नसल्याने वाहन चालकास अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे वाहतुकीचे प्रमाण कमी आहे. पण, लॉकडाऊन होण्यापूर्वीच रस्त्यावर अनेकांचे अपघात झाले आहे. तळेगाव-आर्वी मार्गाचे बांधकाम रखडले असून जीव जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.रस्ता देखभालीसाठी वीस हजार प्रति किलोमीटर प्रमाणे कंत्राटदाराला शासनाकडून निधी मिळतो. मात्र, थातुरमातूर कामे दाखवून शासनाला चूना लावण्याचा प्रकार सुरू आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात येत असल्याने यावर कार्यकारी अभियंता नागपूर यांचे नियंत्रण आहे. मात्र, त्यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात मात्र, हा रस्ता आवागमण करणाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनणार असल्याने तत्काळ रस्ता काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.देवळी ते दहेगाव रस्त्याच्या केवळ दुरुस्तीची मंजुरी मिळाली होती. त्यामुळे खराब रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले असून उर्वरित रस्त्यावरील खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली. पून्हा निधी उपलब्ध झाल्यावर नव्याने डांबरीकरण करण्यात येईल.- इंद्रकुमार पेठणकर, उपअभियंता, सा.बां.वि.,देवळी.
तळेगाव-आर्वी मार्ग मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST
वर्षभरापूर्वी तळेगाव ते आर्वी रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरूवात झाली होती. मार्गावरील काही अंतरापर्यंतचा तर काही ठिकाणी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला होता. नदी-नाल्यंवरील पूल खचवून पुलाच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक वळण मार्गाने वळविण्यात आली होती.
तळेगाव-आर्वी मार्ग मृत्यूचा सापळा
ठळक मुद्देअर्धवट रस्त्यामुळे अडचण : नागरिकांचा जीव मुठीत सुरू आहे प्रवास