शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

प्रेरणा घेत चंपारणमध्ये पुन्हा नयी तालिम रुजवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 22:47 IST

ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.

ठळक मुद्देहेमनाथ राव : सेवाग्राम येथील शांती भवनातील प्रशिक्षणाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ज्या उद्देशाने आपण येथे कार्यशाळा घेतली, तो उद्देश यशस्वी झाला. गांधीजींच्या कर्मभूमीतून प्रेरणा व कौशल्य घेऊन चंपारणमध्ये आपण पुन्हा नयी तालिम रूजवू शकू, असा विश्वास तुमचे उत्साही चेहरे, सखोल सहभाग आणि मांडणी यावरून मला जाणवते, असे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, पटनाचे संचालक हेमनाथ राव समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.नयी तालिम समिती अंतर्गातील आनंदनिकेतन विद्यालयाद्वारे चंपारण जिल्ह्यातील बितीहर्ता केंद्राच्या शिक्षकांसाठी शांतीभवनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. हेमनाथ राव म्हणाले, पूर्ण वातानुकूलित व अत्याधुनिक व्यवस्था असल्याशिवाय कुठलेही प्रशिक्षण चांगल्यारितीने पार पडत नाही, असा समज या ठिकाणी खोटा ठरला आहे. मातीच्या भिंती, कवेलूचे छत अशा इमारतीमध्ये खडू, फळा व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज करता येईल, अशा उत्पादक कामातून उत्तम शिक्षण दिले जाऊ शकते. एवढेच नव्हे, तर मानवीय गुणांची उत्तमरीत्या रूजवण केली जाऊ शकते, हे प्रशिक्षणातून सहजपणे जाणवले. बिहार राज्यात ३५० नयी तालिमची विद्यालये होती. तेथे नयी तालिम पुनर्जीवित करण्याचा बिहार सरकारचा प्रयत्न असल्याचे राव यांनी सांगितले.नयी तालिम समितीचे मंत्री प्रा.प्रदीप दासगुप्ता यांनीही विचार व्यक्त केले. प्रशिक्षणात सहभागींंना प्रगत शिक्षण संस्था फलटणच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबाळकर यांनी बागकाम, शिवणकाम, सफाई, सायकल दुरूस्ती, स्वयंपाक, बालसभा यासारख्या उपक्रमातून विविध इयत्तांचे विषयज्ञान कसे जोडले जाऊ शकते व संविधानिक मूल्यांवर आधारित सहयोगी शाळा संस्कृती कशी विकसित केली जाऊ शकते, याचे प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे देण्यात आले.पुण्यातील नवनिर्मिती या संस्थेच्या डॉ. प्रीती पै आणि स्वाती बाकरे, आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा, कृणाल देसाई, जयमाला गावंडे, जयश्री कामडी, शंकर भोयर, पंडित चन्नोळे, शरद ताकसांडे, मीना काकडे, वर्षा खरडे, तुलिका वर्मा, अद्वैत देशपांडे, शुची सिन्हा आदींनी मार्गदर्शन केले. राकेश कुमार राय यांनी अनुभव कथन केले.नयी तालिममध्ये महत्त्वाचा असतो. उत्पादक काम, निसर्ग व समाज यांच्यासोबत समाजजोडणी करीत ज्ञानाची बांधणी कशी करता येऊ शकते, हे आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष अनुभव घेत जाणून घेतले. अजय कुमार यादव यांनी आजच्या आधुनिक युगातही हे शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे आम्हाला या ठिकाणी समजले. आमच्या आदिवासी क्षेत्रात या पद्धतीचा उपयोग नक्कीच करणार, असे सांगितले. बिहार राज्यातील तेरा शाळांचे एकवीस शिक्षक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.