शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय चणा खरेदी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:35 IST

शासनाच्या हमी भाव योजनेंतर्गत दि. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग लि. वर्धा यांचे सब एजन्ट म्हणून सिंदी सहकारी शेतकरी विक्री समिती मर्यादित ही संस्था सिंदी रेल्वे येथे चणा खरेदीचे काम करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : आमदार व खासदारांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : शासनाच्या हमी भाव योजनेंतर्गत दि. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग लि. वर्धा यांचे सब एजन्ट म्हणून सिंदी सहकारी शेतकरी विक्री समिती मर्यादित ही संस्था सिंदी रेल्वे येथे चणा खरेदीचे काम करीत आहे. वखार महामंडळातील गोदामात साठवणुकीसाठी जागा नसल्याने दि. विदर्भा को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि. वर्धा यांच्या ८ मे २०१८ च्या आदेशान्वये ९ मे २०१८ पासून चणा खरेदी तात्पुरती बंद ठेवण्यात आली. या विरोधात सिंदी रेल्वे येथे आलेले आ. समीर कुणावार व खा. रामदास तडस यांना चणा खरेदी त्वरीत सुरू करण्याबाबतचे व ग्रेडरची वेळ वाढवून देण्याची मागणी निवेदन देऊन शेतकरी संघटनेच्यावतीने माजी जिल्हाध्यक्ष निळकंठ घवघवे यांनी केली आहे.सिंदी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादीत या संस्थेकडे ८ मे पर्र्यंत ७०३ शेतकऱ्यांची चणा विक्री करीता आॅनलाईन नोंदणी केली आहे. नाफेडचे ग्रेडर शरद कुंमरे हे आडमुठी धोरण अवलंबित केंद्रावर सकाळी १०.३० ला येतो व ५ वाजता केंद्र बंद बंद करायला लावून परत जात असल्याने ८ मे पर्यंत १० दिवसात केवळ ९८ शेतकºयांचाच चणा खरेदी करण्यात आला. दररोज १५ ते २५ शेतकºयांची नोेंदणी होत आहे. दिवसेंदिवस चणा विक्री करणाºयाची संख्या वाढत आहे; पण ग्रेडरच्या नियमाने फार कमी शेतकºयांचा चणा दिवसाकाठी विक्री करता येत असून चणा खरेदीची अंतिम मुदत २९ मे ही आहे. पुढील महिन्यात शेतकºयांची शेतीची कामे सुरू होत असल्याने कुठलाही चणा उत्पादक शेतकरी चणा विक्री पासून वंचित राहू नये या करिता तात्पुरती बंद करण्यात आलेली चणा खरेदी त्वरीत सुरू करून ग्रेडरला मुक्कामी राहण्याच्या सूचना देण्यात याव्या. चणा खरेदीचे काम रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवावे. कारण चणा विक्री पासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी खा. तडस व आ. कुणावार यांच्याशी झालेल्या चर्चेअंती सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सदर प्रकरणी बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा पणन व्यवस्थापक शाखा वर्धा दि. विदर्भ को. आॅपरेटीव्ह माकेर्टीग फेडरेशनचे देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.शेतकरी चणा खरेदीच्या प्रतीक्षेतनाचणगाव- पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे चणा खरेदी केंद्र आहे; पण गोदामाच्या समस्येमुळे येथे अद्याप खरेदी सुरू झाली नाही. यामुळे या केंद्रावर खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.या केंद्रावर खरेदी विक्री संस्था देवळीच्या माध्यमातून नाफेड चणा खरेदी करणार आहे. मात्र, अजूनपर्यंत चणा खरेदी नाफेडकडून सुरू करण्यात आली नाही. आॅनलाईन नोंदणी असल्यानंतर शेतमाल खरेदी प्रक्रिया नाफेड करते. येथे मोजक्याच शेतकऱ्यांची चणा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी झाली. तसेच नोंदणीधारक शेतकऱ्यांचा चणा घेण्यास नाफेड तयार नाही.या बाबत जिल्हा मार्केटींग अधिकारी व्ही.पी. आपदेव यांच्याशी संपर्क साधला असता गोदामाची व्यवस्था नसल्याने चणा खरेदीत अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच खरेदी सुरू करण्यात येईल असेही सांगितले.बाजारपेठ व नाफेडच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकरी वर्ग चणा विक्रीसाठी नाफेडच्या खरेदी केंद्रावर चकरा मारत आहेत. शेतमालाला चांगला भाव मिळाल्यावर येणाऱ्या खरीप हंगामात ही रक्कम आपणास वापरावयास मिळेल, अशी शेतकºयांची भावना आहे. नाफेडने लवकरात लवकर चणा खरेदी करावा, अशी मागणी शेतकºयाची आहे.