शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या धुराने कर्मचारी त्रस्त

By admin | Updated: October 29, 2016 00:54 IST

केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे.

पालिकेकडे तक्रार : आरोग्यविषयक समस्यांनी घेरलेवर्धा : केळकरवाडी परिसरात जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या शासकीय कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीला लागूनच कचऱ्याचा ढोला ठेवला आहे. येथील कचरा ढोल्यातच पेटविण्यात जातो. त्यामुळे निघाणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिक आणि कार्यालयातील कर्मचारी वर्गाला होत आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही हा प्रकार सुरूच असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दिली आहे. येथे ठेवण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढोल्यात परिसरातील नागरिक कचरा टाकतात. यात कचरा जमा झाला नसला तरीही दररोज कचरा पेटविण्यात येतो. यामुळे कचरा कुंडीतील धूर इमारतीच्या तावदानातून पूर्ण इमारतीमध्ये पसरतो. अशात कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बसून कामकाज करणे असह्य होते. त्यांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कचरा पेटविताना कचऱ्यातील प्लास्टिक, थर्माकोल जळाल्याने विषारी धूर बाहेर पडतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाला काम करताना डोकेदुखी आणि श्वसनाचे विकार बळावण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी याविषयी तक्रार केली. मात्र हा प्रकार आजतागायत सुरुच आहे. तसे पाहता येथील कचरा गोळा करुन अन्यत्र नेऊन विल्हेवाट लावणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा कार्यालयाचे इमारतीला लागून असलेली कचराकुंडी तात्काळ हलविण्यात यावी किंवा योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी केली. यावेळी ए.बी. कडू, ए.आर. वडे, सी.जे. भुसारी, मोना मानेकर, आर.एस. थुल, पंकज भारसाकळे, जी.एन. शेळके, ठाकूर, नांदुरकर, पोचमपल्लीवार, वडते, माळी, आडे, डफ, पाटील, जाधव, रोहणकर, नरेंद्र नागतोडे, नितनवरे आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)येथील कर्मचारी वर्गाला दमा, फुफ्फुसांचे आजार, डोळ्यांचे व श्वासाचे, घश्याचे आजार बळावत आहे. कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिक या प्रकारामुळे त्रस्त आहे.कचरा पेटविताना यातून बाहेर पडत असलेल्या घातक वायुमुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. यापूर्वी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकाराविषयी लेखी, तोंडी निवेदन दिले आहे. परंतु पालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.पालिकेचे कर्मचारी येथील कचरा नियमीत उचलत नाही तर पेटवुन देतात. याप्रमाणे कचरा पेटविल्याने प्राणीमात्रांना धोका असतो. शिवाय यातून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. पुढील धोका टाळण्याकरिता येथील कचरा उचलुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. अन्यथा याप्रमाणे कचरा पेटविणे बंद करणे गरजेचे झाले आहे.