सोयाबीन होणार आंतरपीक : शेतकरी करताहेत कमी खर्चाचे नियोजनविजय माहुरे घोराडकमीत कमी खर्च करून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचा पेरा वाढणार असून सोयाबीनचे पीक आंतरपीक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापूस हा नाममात्र ठरण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे मत तालुक्यातील जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे.नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला गत काही वर्षांपासून मिळत असलेला भाव हा परवडणारा नाही. त्यामुळे कापसाचे पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या हतबल करणारे ठरत आहे. कापसाला येणारा खर्च पाहता कापूस पिकापासून शेतकरी दूर जाण्याची चिन्हे दिसत आहे. तालुक्यात केळीच्या बागाही योग्य भाव मिळत नसल्याच्या कारणामुळे नामशेष झाल्या आहेत. ज्वारीच्या पिकापासूनही याच कारणामुळे फारकत घेत सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळले होते. पण दिवसेंदिवस सोयाबीनच्या उत्पन्नात घट येवू लागली आहे. त्यामुळे यंदा कमी खर्चात परवडणारे पीक घेणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्यास्थितीत तुरीला ७ ते ८ हजार रूपये क्विंटल असणारा भाव पाहता आंतरपीक म्हणून ओळखले जाणारे तुरीचे पीक यंदाच्या करीपात मुख्य पीक म्हणून घेण्याचा मानस शेतकरी व्यक्त करीत आहे. दरवर्षी तोट्याची शेती होत असल्याने कर्जाच्या डोंगराखाली सातत्याने राहावे लागत आहे. नवनवे तंत्रज्ञान शेती व्यवसायात आले असून उत्पन्नातही वाढ होत आहे. पण या सर्वांसोबत लागवडीचा खर्चही वाढत असून कापसाला मिळत असलेला भाव हा अत्यल्प आहे. सरते शेवटी दर वाढून केवळ व्यापारी वर्गाचा फायदा करून देणारे पीक अशी कापसाची नवी ओळख आहे. दरवर्षी नुकसान सहन करून आर्थिक विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना घरखर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न सोडविण्यासाठी कमीत कमी खर्च करून अधिकाधिक उत्पन्न शेतीतून कसे घेता येईल या मार्गाचा शोध रेत्या खरीप हंगामात शेतकरी घेत आहे.अवास्तव खर्चाला फाटा तूर पिकाची शेती करून यामध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेतले असता सोयाबीनच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून तूर पिकाचा खर्च निघू शकतो. रासायनिक खत, मशागतीचा खर्च व मजुरीचा खर्च ही कमी येतो. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न तुरीपासून मिळविता येणे शक्य होणार आहे. जे खायचे ते पिकवायचेकापसाचे पीक पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने विदर्भात सर्वत्र घेतले जाते. पण कापूस उत्पादित झाल्यावर तो खाता येत नाही. त्यापेल्षा जे खायचे तेच पिकवायचे असा विचारही आता शेतकरी करू लागते आहे. तूर पीक ठरतेय नवा पर्यायतालुक्यात यंदा तुरीचे उत्पादन समाधानकारक झाले. अनेकांनी केवळ तुरीचे उत्पादन घेऊन आपली प्रगती साधत नवा पर्यायही शेतकरी वर्गासमोर निर्माण केला आहे. त्यामुळेही तुरीचा पेरा वाढणार असल्याचे संकेत तालुका कृषी विभागाद्वारे दिले जात आहे.
यंदाच्या खरीप हंगामात वाढणार तुरीचा पेरा
By admin | Updated: April 25, 2016 01:58 IST