शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
4
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
5
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
6
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
7
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
8
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
9
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
10
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
11
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
12
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
13
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
14
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
15
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
16
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
17
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
18
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
19
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
20
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की

गिरड येथील श्रीराम देवस्थानाचे तिसऱ्या शतकात पदार्पण

By admin | Updated: April 4, 2017 01:20 IST

१३३ वर्षांचा इतिहास असलेली येथील रामजन्म घोडायात्रा विदर्भात हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक मानले जाते.

१३३ वर्षांपासूनचा रामजन्म व ऐतिहासिक घोडायात्रा ठरते हिंदू- मुस्लीम एकतेचे प्रतिक लालसिंग ठाकूर गिरड१३३ वर्षांचा इतिहास असलेली येथील रामजन्म घोडायात्रा विदर्भात हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतिक मानले जाते. येथील राम मंदिराला २०१५-२०१६ मध्ये दोन शतक पूर्ण झाले. यंदाच्या रामनवमीपासून तिसऱ्या शतकाला प्रारंभ होत आहे. सीताराम महाराजानी भ्रमंतीदरम्यान या घोडा यात्रेचा प्रारंभ केल्याची आख्यायिका आहे. या वर्षीच्या घोडा यात्रेचे हे १३३ वे वर्षे आहे. या प्राचीन यात्रेला हिंदु-मुस्लीम भाविकांची गर्दी उसळते. दोन दशके पूर्ण करणाऱ्या राम मंदिरच्या जागेवर त्याकाळी पैठण येथून आलेले सीताराम महाराज यांचा मठ होता. नंतर याच मठाचे रूपांतर राममंदिरात झाले. त्या मठात श्रीराम-लक्ष्मण-सीतेची मूर्ती विराजमान झाली. दरम्यान ४० वर्षांनी सीताराम महाराजांनी देह त्यागला. त्यानंतर मठाची जबाबदारी रामकृष्ण महाराज यांनी घेतली. ३० वर्षांची त्यांनी समाधी घेतली. यानंतर बाजीराव महाराज यांनी मठ सांभाळला. त्यांनी जुन्या झोपडीत श्रीराम मंदिराची स्थापना केली. त्यासाठी मंदिरच्या जमिनीच्या उत्पन्नाचा आधार घेतला. १९९८ मध्ये त्यांनी समाधी घेतली. यानंतर त्यांचे शिष्य मनसाराम महाराज यांनी काम सांभाळले. १० वर्षांनी त्यांनी देह त्यागला. त्यानंतर रूपराम महाराज, नंतर अनंतदास महाराज, रामदास शास्त्री यांनी सांभाळले. १९६६ पासून या मंदिराची देखरेख व कामकाज विश्वस्त मंडळ सांभाळत आहे. देवस्थान जवळ असलेली २०० एकर जमीन नागपूरातील वाडा, वडकी (खैरी) येथील जमीन हिंगणघाटचे मंदिर हे उत्पन्नाचे स्त्रोत्र आहे. सन १८८५ मध्ये घोडायात्रा सुरू झाली. या यात्रेकरिता वापरण्यात येत असलेला घोडा चंद्रपूर जिल्ह्यातील एका कलावंताने लाकडापासून बनवला. गत १३३ वर्षांपासून हाच रथ वापरला जातो. या घोडायात्रेला विदर्भातून रामभक्त येत शेख फरीद बाबाचेही दर्शन घेत असतात. मंदिराला तब्बल ६५ खांबनागपूर-हैद्राबाद महामार्गावर जाम येथून २१ कि़मी. अंतरावर उमरेड मार्गावर सदर देवस्थान आहे. प्राचीन इतिहास असलेले गिरडचे राममंदिर ६५ खांबावर डौलदार उभे आहे. आजही मंदिर नविनच वाटते. उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना म्हणून या देवस्थानची ओळख आहे. ती मोठे दरवाजे, २०० एकर जमीन, लाकडी घोडा, रथ, श्रीरामाची विलोभनीय मूर्ती, पहारेकरी, पालखी आजही जैसे थे आहे. याच देवस्थानचा नागपुरात मोठा वाडा आहे. त्या काळात ६०० एकर जमीन दानात मिळाली. मंदिराकडे सध्या २५० गुरे असून गोशाळा आहे. व्यायाम शाळा सोबत आयुर्वेदिक दवाखाना आहे. या व्यतिरिक्त इतर संपत्तीही आहे. वर्धा जिल्ह्यातील प्राचीन इतिहासाचे साक्ष म्हणून देवस्थानाला व राम-घोडा यात्रेकडे आजही पाहल्या जाते. या मंदिराचे विश्वस्त बबन दाभणे, वसंत पर्बत, प्रभाकर दाते, सुधाकर बाकडे, संदीप शिवणकर, शालिक बाडे, टिपले, ब्राह्मणवाडे, व्यवस्थापक सुरेश गिरडे या मंदिराचे काम सांभाळत आहे.देवस्थानाला तीन शतकांची परंपराआज सर्वत्र रामजन्म उत्सव मोठ्या धुमधडाक्याने साजरा होतो. पण हे राममंदिर २०० वर्षांपासून हा उत्सव साजरा करीत आहे. येथील प्रभु रामचंद्राची मूर्ती ही साक्षात असून याच आवारात हनुमंताची मूर्ती असून याचे दर्शन प्रथम होते. तिसऱ्या शतकात प्रवेशित झालेले हे देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे.प्रशासनाचे दुर्लक्षगिरड हे पर्यटन स्थळ आहे. भाविकांचे श्रद्धादान आहे. येथील दर्गाहवर हिंदु-मुस्लीम ऐक्याचा अनुभव येतो. राममंदिर प्राचीण इतिहासाची साक्ष देणारे आहे. या देवस्थानच्या विकासासोबत परिसराचे वैभव वाढविण्यास प्रशासन व विश्वस्त मंडळ मात्र उदासीन आहे.