घोराड : एक वर्षापूर्वी सुरगाव ग्रा़पं़ वादविवादामुळे चर्चेत आली़ यानंतर आलेल्या ग्रामसचिवाने विकासात्मक वाटचाल केल्याने त्यांची बदली न करता त्यांना कायम करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे़ याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे़ मागील काही ग्रामसभांत गदारोळ झाल्याने सुरगाव ग्रा़पं़ ला एस.के. गुडवार यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली़ ग्रा़पं़ निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले. नव्याने आलेल्या समितीने गाव विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला़ दोन महिने ग्रामसेवकाविना राहिलेली ग्रा़पं़ आता सुरळीत होत असताना केवळ सहा महिन्याचा कालावधी झालेल्या ग्रामसेवकाची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली़ यामुळे पुन्हा विकासाला खिळ बसण्याची शक्यता निर्माण झाली़ यामुळे एल.के. गुडवार यांची बदली करण्यात येऊ नये, त्यांना सुरगाव येथे पूर्णवेळ कायम करावे, अशी मागणी सरपंच मंदा उईके, उपसरपंच अनंता पाटील आदींनी सोमवारी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली़(वार्ताहर)
सुरगावच्या ग्रामसचिवाला कायम करा
By admin | Updated: September 2, 2014 23:58 IST