शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

उन्हाळ्यातील वैरण टंचाईवर मात

By admin | Updated: March 25, 2015 02:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात प्रत्येक वर्षी वैरण टंचाई भासत आली आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे जिल्हा परिषदेचा अहवाल सांगत आहे.

रूपेश खैरी वर्धाउन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात प्रत्येक वर्षी वैरण टंचाई भासत आली आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे जिल्हा परिषदेचा अहवाल सांगत आहे. जिल्ह्यात वैरण निर्मितीकरिता विविध ठिकाणी मका व ठोब्यांची लागवड केल्याने गरज भागवून वैरण शिल्लक राहत आहे. छोट्या मोठ्या जनावरांकरिता एकूण ८ लाख ८० हजार २०० मेट्रीक टन वैरण आवश्यक आहे; मात्र विविध क्षेत्रातून एकूण १० लाख ७३ हजार ८५५ मेट्रीक टन वैरण तयार होत आहे. यामुळे जिल्ह्यात वैरण टंचाई निर्माण होण्याचे चिन्ह नाही. यामुळे उन्हाळ्यात जनावरांकरिता कुठेही चारा डेपो सुरू होणार नसल्याची माहिती आहे. १९ व्या पशुगनणेनुसार जिल्ह्यात छोटी व मोठी अशी ४ लाख ८९ हजार १७३ जनावरांची नोंद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे आहे. यात २ लाख ४४ हजार ४०३ मोठी तर २ लाख ४४ हजार ७७० छोटी जनावरे आहेत. यात गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या या वर्गातील जनावरांचा समावेश आहे. पशुवैद्यकीय अहवालानुसार मोठ्या जनावरांना दिवसाकाठी सात किलो तर छोट्या जनावरांना तीन किलो वैरण आवश्यक आहे. या मापकानुसार एकूण ८ लाख ८० हजार २०० मेट्रीक टन वैरणाची गरज आहे. ही गरज भागवूनही जिल्ह्यात सुमारे १ लाख ९३ हजार ६५५ मेट्रीक टन वैरण शिल्लक राहत असल्याचे सोमवारी समोर आले. यामुळे वैरणाच्या निर्यातिची स्थिती आहे. वनविभागाकडून ९१,११५ मेट्रीक टन चाऱ्याची निर्मितीजिल्ह्यातील आठही तालुक्यातील वनविभागाच्या क्षेत्रातून एकूण ९१ हजार ११५ मेट्रीक टन वैरणाची निर्मिती होत असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालात नमूद आहे. यात वर्धा तालुक्यातून १,१५७, देवळी १,१९६, सेलू ९,३२६, हिंगणघाट २,७८४, समुद्रपूर ८,४६४, आर्वी २५,२२४, आष्टी १८,३२६ तर कारंजा तालुक्यातून २४,१३८ मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन होणार आहे. या व्यतिरिक्त असलेल्या समुद्रपूर, आर्वी, आष्टी व कारंजा या तीन तालुक्यात असलेल्या सहा कुरणातून ९४५ मेट्रीक टन चारा निर्माण होत आहे. या चाऱ्याच्या आधारावर या भागातील जनावरे चरत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या भागात असलेल्या जंगली श्वापदांच्या हल्ल्यामुळे या भागात जनावरे जात नसल्याची ओरड आहे. चारा टंचाई निवारणार्थ ३७.३५ लक्ष रुपयांचे अनुदान जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होणार नाही याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने पशुसंवर्ध विभागाला उपाययोजना आखण्याकरिता एकूण ३७ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यापैकी एकूण ६ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. खर्च झालेल्या रकमेत पशुसंवर्धन विभागाच्यावतीने २८ हजार ३२९ किलो वैरण बियाणे वाटप करण्यात आले आहेत. तर कुषी विभागाच्यावतीने एकूण १८ हजार ८०० किलो बियाणे वाटप करण्यात आले आहेत. वाटप करण्यात आलेल्या बियाण्यांचा ९४३ हेक्टरवर पेरा करण्यात आला. या व्यतिरिक्त पशुसंवर्धन विभाग व कृषी विभागाच्यावतीने ठोब्यांचे वितरणही करण्यात आले आहे. ठोब्यांचा पेरा जिल्ह्यात एकूण ७० हेक्टरवर करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होणार नसल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त कृषी विभागाच्यावतीने मका पिकाचे बियाणे वाटप केले आहेत.