शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन परवाना अडचणीचा

By admin | Updated: August 1, 2016 00:23 IST

वाहन चालविण्याच्या शिकाऊ परवान्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली.

गौरव देशमुख वर्धा वाहन चालविण्याच्या शिकाऊ परवान्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली. पद्धत सोपी आणि पारदर्शक करण्याकरिता राबविण्यात येत असलेली ही परीक्षा मात्र डोकेदुखीची व आर्थिक नुकसानीची ठरत असल्याची ओरड होत आहे. परीक्षेकरिता खासगी संगणक केंद्रात गेल्यास या नोंदणीकरिता वाहन चालकाला ३१ रुपयाच्या परवान्यासाठी तब्बल १०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. वाहन चालविण्याच्या परवान्याकरिता आॅनलाईन परीक्षा सुरू झाली. याला सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात एकूण ६६ हजार ११० जणांनी आॅनलाईन परीक्षा दिली; परंतु या परीक्षेबाबत कुठलेही मार्गदर्शन व माहिती मिळत नाही. यामुळे या काळात केवळ ३६ हजार ८०७ चालक परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांनाच परवाना मिळाला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. दुचाकी चालकाच्या शिकाऊ परवान्यासाठी १ जानेवारी २०१३ ते ३० जून २०१६ पर्यंत ६६ हजार ११० जणांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यात ७०९ उमेदवार गैरहजर राहिले. यातील काहींनी आवश्यक शुल्क भरले. दुचाकीच्या शिकाऊ परवान्यासाठी गत ३ वर्षांपासून आॅनलाईन अपॉईटमेंट घ्यावी लागते. यामुळे वेळेची बचत होते. शिवाय सहज पद्धतीने हा परवाना मिळणार असल्याने वाहन चालकांचीही सोय होते. हाच उद्देश समोर ठेवत तीन वर्षांपासून शिकाऊ परवान्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. आॅनलाईन परीक्षा सर्वसामान्यांना सोयीची असावी व ती सहज पद्धतीने देता यावी हे अभिप्रेत आहे. त्यानुसार इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही संगणकावरून किंवा स्मार्ट फोनवरूनही अपॉईटमेंट घेता येते; परंतु आॅनलाईन परीक्षेबाबत कुठल्याच प्रकारची माहिती परीक्षेला बसण्याअगोदर देण्यात येत नसल्याने उमेदवारांसमोर अडचण निर्माण होते. दरम्यान उमेदवारांना आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर दिलेल्या वेळेवर उपप्रादेशिक कार्यालयात येऊन आॅनलाईन परीक्षा द्यावी लागते. या आॅनलाईन चिन्हाबाबत उमेदवारांना कोणतीही माहिती नसल्यामुळे अनेकजण या परीक्षेत नापास होत आहेत. यामुळे पुन्हा वेळ घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी चांगलीच अडचणींची ठरत आहे. यातून उमेदवारांना वाहतुकीच्या नियमांचे कितपत आकलन आहे, हे तपासले जाते. हे एका दृष्टीने चांगले असले तरीही परीक्षा कशी होणार आहे. याची माहिती नसल्याने उमेदवारांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिकाऊ उमेदवारांची ही अडचण लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती पत्रकाचे वाटप झाल्यास उमेदवारांना परीक्षा देताना फायदा होऊ शकतो.