वर्धा : शहरातून दुचाकी चोरून त्या बाहेरगावात विकणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत १ लाख ६३ हजार रुपयांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्यात़येथील बसस्थानकावरून दुचाकी चोरी करताना एका चोराला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने शहरातून दुचाकी चोरून त्याच्या सहकाऱ्यांना विकत असल्याचे कबूल केले. पहिले अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सूरज रामभाऊ वखरकर (२०) रा. मातामंदिर वॉर्ड हिंगणघाट, असे असल्याचे सांगितले. तो वर्धेतील बजाज चौक, बसस्थानक, रेल्वे स्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय या भागातून दुचाकी चोरून विकत असल्याचे समोर आले. या कामात त्याला प्रफूल्ल हरिचंद्र डोंगरे (१९) रा. जनता मैदान वरोरा, जि. चंद्रपूर याचे सहकार्य मिळत होते. हे दोघे मिळून रिजवान अमिर खॉ पठाण (२०) रा. कमलनगर, वडसा यास त्या गाड्या विकत होते़ तो गाड्यांचे क्रमांक बदलवून त्या गाड्या ग्राहकांचा शोध घेत विकत असल्याचे समोर आले. या तिघांनाही शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्या जवळून चोरीतील नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी भांदविच्या कलम ३७९, २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी वानखेडे, ठाणेदार एम. बुराडे, सहायक निरीक्षक बाभरे, सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर निशाने, गजानन गहुकर, आकाश चुंगडे, धर्मेंद्र अकाली, रितेश शर्मा व विशाल बंगाले यांनी केली.(प्रतिनिधी)
१़६३ लाखांच्या नऊ दुचाकी जप्त
By admin | Updated: September 2, 2014 23:57 IST