वृक्षवेडा शिक्षकगत २२ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात असलेले सुधीर सगणे यांनी अध्यापनासह वृक्षसंवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे़ तथाकथित नव्हे तर प्रत्यक्षरित्या त्यांनी २०० झाडे जगविली आहेत़ शाळेच्या ठराविक वेळेव्यतिरिक्त ते विद्यार्थ्यांना अध्यापन करतात़ त्यांच्या या प्रभावी पद्धतीमुळे मराठी माध्यमात शिकणारा इयत्ता दुसरीतील विद्यार्थी इंग्रजी भाषेतील वाक्यरचना तयार करतो़ ग्रामीण विद्यार्थ्याला इंग्रजीतील ‘कर्सिव्ह’ लेखण करता यावे, यासाठी ते प्रयत्नरत असतात़ सध्या ते गोजी येथील जि़प़ शाळेत कार्यरत आहेत़गरजू विद्यार्थ्यांना मदतकारंजा येथील मॉडेल हायस्कूलचे प्राचार्य सतीश ठाकरे यांनी विद्यार्थी सहायता योजना परिणामकारकरित्या राबविली़ या माध्यमातून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे़ यासह शासनाकडून वेतनेतर अनुदान नसताना शाळेत त्यांनी सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविलेत़प्रयोगशील शिक्षणावर भररोहणा येथील मॉडेल हायस्कूलमध्ये कार्यरत प्रवीण शिरपूरकर हे विद्यार्थीकेंद्रीत अध्यापन पद्धतीचा अवलंब करतात़ यामुळे ते लोकप्रिय शिक्षक ठरले आहेत़ प्रयोगशील शिक्षण पद्धतीवर भर देत पुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो़ शासनाच्या विविध योजनांतील प्रशिक्षणाकरिता मार्गदर्शक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे़स्वाध्याय पुस्तिकेचा उपक्रमदेवळी पंचायत समितीमधील उच्च प्राथमिक शाळा अडेगाव येथे कार्यरत असलेले विजय कोंबे हे विद्यार्थ्यांत आवडते आहेत़ त्यांनी आजपर्यंत १७ विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून दिला आहे़ यासह ‘स्वाध्याय पुस्तिका’ हा उपक्रम दानदात्यांच्या मदतीने त्यांनी सुरू केला़ शिवाय गरजू विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप ते करतात़ शाळेच्या परिसरात विद्यार्थी व सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी परसबाग फुलविली़ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवाचे शिक्षण देण्याकरिता हा उपक्रम ते अव्याहतपणे राबवित आहेत़ प्रकाश झोतात न येता विद्यार्थी घडविण्यास ते प्रयत्नशील असतात़मुलींना केले स्वावलंबीनगर परिषदेच्या कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षिका विनया आष्टनकर यांनी समाजातील गरीब व होतकरू मुलींना सहकार्य करून त्यांना स्वावलंबी बनविले़ कैद्यांना राखी बांधून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा पहिला प्रयोग त्यांनी राबविला़ दहा वर्षांपासून महाविद्यालयीन मुलींच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू आहे़ यासह सामाजिक सख्य निर्माण करण्याच्या कार्यात त्या सक्रीय असतात़शैक्षणिक साहित्य निर्मितीतून अध्यापनशैक्षणिक साहित्य निर्मितीच्या माध्यमातून अध्यापन करण्याची बाजीराव चांभारे यांची हातोटी आहे़ यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत विषयाचे ज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यात ते यशस्वी ठरले आहेत़ विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांनी कृतिशील अध्ययन पद्धतीचा अवलंब केला आहे़ शासनाने त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे़ मुरदगाव (बे़) येथील जि़प़ शाळेत ते कार्यरत आहेत़ झोपडपट्टीतही पटसंख्या पूर्णझोपडपट्टी परिसरात वास्तव्य असलेल्या विद्यार्थ्यांना शिस्त लावत प्रभावी शिक्षण देण्याकरिता गुल्हाणे सदैव तत्पर असतात़ शिवाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते तालुका संघटक असल्याने तेथील पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासह अंधश्रद्धेचे निर्मूलनाचा प्रयत्न, असे दुहेरी कार्य ते करतात़ झोपडपट्टीचा परिसर असला तरी हजेरीपटावर विद्यार्थ्यांची संख्या पैकीच्या पैकी ठेवण्यासाठी ते धडपडत असतात़ वर्धा नगर परिषदेच्या शिवाजीपेठ शाळेत ते गत १८ वर्षांपासून कार्यरत आहेत़शैक्षणिक साहित्याला फाटापठडीच्या बाहेर जाऊन मुलांना शिकविण्यात गुणवंत बाराहाते यांचा हातखंडा आहे़ या कर्तृत्त्वाची दखल घेत शासनाने त्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला आहे़ प्रचलित खडू व फळा या शैक्षणिक साहित्याला फाटा देऊन अवांतर वाचनासह अन्य उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्याचा कल आहे़ शिष्यवृत्तीचे वेगळे तास घेऊन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात़ सिरसगाव (ध़) येथील जि़प़ शाळेत कार्यरत बाराहाते हे इंग्रजी अध्यापन विषय मंडळावर सदस्य आहेत़
चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीला ‘त्या’ शिक्षकांनी दिलाय नवीन आयाम
By admin | Updated: September 4, 2014 23:59 IST