शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

राष्ट्रवादीच्या मोर्चामुळे समुुद्रपूरवासीयांचा ‘फ्लॅशबॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:37 IST

तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी १९८१ मध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने भव्य मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील जाम चौरस्त्यावर चक्काजाम केला होता. त्यानंतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलने झाली पण, इतका उदंड प्रतिसाद मिळाला नाही.

ठळक मुद्देजागविल्या जुन्या आठवणी : २९ वर्षानंतर शेतकरी प्रश्नासाठी एकवटले महिला-पुरुष

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी १९८१ मध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने भव्य मोर्चा काढून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील जाम चौरस्त्यावर चक्काजाम केला होता. त्यानंतर शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलने झाली पण, इतका उदंड प्रतिसाद मिळाला नाही. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात २६ नोव्हेबर २०१८ रोजी तहसील कार्यालयावर धडकलेल्या विराट मोर्चा पाहून समुद्रपुरवासियांना तब्बल २९ वर्षानंतर १९८१ च्या शेतकरी संघटनेच्या भरभराटीच्या काळातील मोर्चाची आठवण झाली.सन १९७५ ते १९८५ या काळात शरद जोशी यांच्या प्रेरणेने तालुक्यातील तत्कालीन समर्थक डॉ.सुधीर खेडूलकर व बसंतराज निखाडे, गिरडचे भावराव गाठे, समुद्रपूरचे ओमप्रकाश चौधरी व वायगाव (गोंड) येथील सुरेंद्र कुकेकर या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १९८१ ला शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी भव्य मोर्चा काढला होता. हा मोर्चा आजही सर्वांना डोळ्यात साठवून आहे. त्यामुळे नुकताच राष्ट्रवादीच्या निघालेल्या मोर्चाने त्याला उजाळा मिळाला. १९७५ ते १९८५ च्या कालखंडात तालुक्यात शरद जोशी यांनी शेतकऱ्याला जागृत करीत त्यांचे अधिवेशन घेऊन आपल्या हक्काची जाणीव करून दिली. शासनाच्या विरोधात उग्र मोर्चे, निदर्शने व चक्काजाम करुन शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढले.त्यानंतर या संघटनेने राजकारणात प्रवेश केल्यानंतर दहा वर्षाच्या कालखंडात शेतकरी संघटनेचे दहा वर्ष आमदार, पाच वर्ष समुद्रपूर पंचायत समितीचे सभापतीपद, भूविकास बँकचे संचालक व बापुराव देशमुख सुतगिरणीचे संचालक तसेच जिल्हा परिषद सदस्य आदी राजकीय पदे उपभोगता आली. शेतकरी संघटनेच्या राजकीय आखाड्यातील प्रवेशामुळे कालांतरणाने शेतकरी प्रश्न लांब पडू लागले. परिणामी शेतकरीही या संघटनेपासून दोन हात दुर राहायला लागल्याने संघटनेचे नेते शरद जोशी यांनी हिंगणघाट मतदार संघातून १९९५ ला विधानसभेची निवडणूक लढविली. तेव्हा राजकारणातील नवखा तरुण शेतकरी पुत्र अशोक शिंदे यांनी त्यांचा ४ हजार ४०० मतांनी पराभव केला. तेव्हापासूनच शेतकरी संघटनेला ओहोटी लागली. आज शेतकरी संघटना सत्तेच्या लालसेपोटी समुद्रपूर नगरपंचायतमध्ये भाजपाच्या टेकुने सभापतीपद उपभोगत आहे. तर समुद्रपूर बाजार समितीमध्ये राष्ट्र्वादी काँग्रेससोबत घरोबा आहे. त्यामुळे संघटनेने विश्वास गमविल्याने त्यांची आंदोलने, निदर्शने नावापुरतीच राहिली असून आता भरभराटीच्या काळातील त्यांच्या मोर्चाच्या आठवणी दुसऱ्या पक्षाच्या मोर्चातून जागविल्या जात आहे.शेतकरी साल्वंट प्लांटचा फज्जासमद्रपूर तालुक्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळावा या करिता गोविंदपूर येथे १९९४-९५ मध्ये शेतकरी साल्वंट प्लांट तयार करण्यात आला. त्याकरिता शेतकºयांकडून शेअर रुपात भाग भांडवल गोळा केले. कारखाना सुरु झाला परंतु लगेच कारखाना डबघाईस आल्याने शेतकऱ्यांचे भाग भांडवल तर बुडालेच पण शेतकऱ्यांना चुकारेही मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संघटनेबाबत तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.