शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
2
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
3
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
4
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
5
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
6
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
7
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
10
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
11
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
12
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
13
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
15
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
16
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
17
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
18
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
19
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
20
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

वजनकाट्यात सर्रास दांडी

By admin | Updated: March 6, 2015 01:52 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत वजन महत्त्वाचे आहे. याच वजनाचा आधार घेत वस्तूची किंमत ठरते. मात्र जिल्ह्यात याच वजनाच्या माध्यमातून काही अपवाद वगळता...

वर्धा : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत वजन महत्त्वाचे आहे. याच वजनाचा आधार घेत वस्तूची किंमत ठरते. मात्र जिल्ह्यात याच वजनाच्या माध्यमातून काही अपवाद वगळता ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील वजनकाट्यांची सहा महिन्यांपासून तपासणीच झाली नसल्याची खळबळजनक माहिती गुरुवारी पुढे आली. जिल्ह्यात अप्रमाणित वजनकाट्यांच्या माध्यमातून व्यवहार सुरू असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. प्रत्येक दुकानातील वजनकाट्याची वर्षाकाठी तपासणी करणे गरजेचे आहे. अन्यथा दुकानदारांना दंड बसतो. वजनकाट्यांच्या दुरुस्तीसाठी रिपेअर, बनविण्यासाठी डिस्ट्रीब्युटर आणि विक्रीसाठी डिलरचे परवाने वजनमापे विभाग देतात. दरवर्षी या परवान्याचे नुतनीकरण करावे लागते. यावर्षी मात्र नुतनीकरणाच्या प्रक्रियेत जाचक अटींचा समावेश केल्याने परवान्यांचे नुतनीकरण करणे परवानाधारकांसाठी कठीण झाले आहे. यामुळे शासनाच्या मोजक्या कर्मचाऱ्यांकडून वजनाची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी आजच्या घडीला अनेक दुकानातील काटे अप्रमाणित असल्याची माहिती आहे. यावर्षी परवान्याच्या नुतनीकरणासाठी विभागाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाला नुकताच जाहीर झाला. यात सारेच नापास झाल्याचे जाहीर करण्यात आले. परीक्षा घेताना ज्या कामाचा परवाना देण्यात येतो त्याच विषयाचे प्रश्न विचारणे अपेक्षित होते; मात्र येथे दुरूस्ती करणाऱ्यांना निर्मात्याचे व डिस्ट्रब्युटरशी संबंधित असलेले प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती आहे. वजनमापे प्रमाणित नसल्याने ग्राहकांनी घेतलेली वस्तू त्यांना आवश्यक असलेल्या वजनाची आहे अथवा नाही हे सांगणे कठीण झाले आहे. परवानाधारक दुकानातील वजनकाट्याची तपासणी करून दुरूस्ती अहवाल जिल्ह्याच्या वजनकाटे तपासणी विभागाला देतात. त्यानुसार दुकानदाराला प्रमाणपत्र देण्यात येत होते. मात्र गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यात असलेल्या दुकानातील काटे तपासल्याच गेली नाहीत. परिणामी ग्राहकांना नुकसान सहन करावे लागत आहे.(प्रतिनिधी) नव्याने आलेल्या अटींमुळे रखडले परवान्यांचे नुतनीकरणवजनमापे रिपेअर, मॅन्युफॅक्चरर आणि डिलर याकरिता दिल्या जाणारा परवाना मिळविण्याकरिता पहिल्यांदाच परीक्षा होत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रमच अस्तित्त्वात नसल्याने अभ्यास नेमका कसला करावा या गोंधळात परीक्षार्थी आहेत. नवीन परवान्याकरिता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर ही पात्रता ठेवण्यात आली आहे. परवानाधारकाचे वर्कशॉप २० चौरस फुटात असावे, त्याच्या व्यवसायाचे दर वर्षाला आॅडीट झाले असावे, त्याच्याजवळ क्रिमिलिअर सर्टीफिकेट असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात रिपेअर, मॅन्युफॅक्चरर व डिलर म्हणून ३५ लोक जिल्ह्यात असलेल्या दुकानातील वजनांची तपासणी करणे, दुरूस्ती करणे व कुणाला नवे वजन विक्रीकरिता एकूण ३५ जण काम करीत आहेत. काहिंचा वडिलोपार्जित हा व्यवसाय आहे. शासनाने नव्याने लादलेल्या अटींमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.शासनाचा महसूल बुडतोयदुकानात जाऊन वजनकाट्यांची दुरुस्ती करून वजन निरीक्षकांकडून प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम वजनमापे दुरुस्तीकर करीत होते. त्या माध्यमातून दुकानदाराला घरबसल्यास वजनकाट्याचे प्रमाणपत्र मिळत होते. यातून शासनाला विना श्रमाने गोळा होत होता. मात्र यांचे परवाने रद्द केल्याने स्वत: वजनमापे निरीक्षकाला आस्थापनेवर जावून तपासणी करावी लागत आहे. यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.६० हजार दुकानांकरिता तीनच कर्मचारी जिल्ह्यात असलेल्या सुमारे ६० हजार दुकान आणि उद्योगातील वजनकाटे तपासणीकरिता केवळ तीनच कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दुकानात जावून वजनकाट्यांची तपासणी करणे कठीण काम आहे. यामुळे बऱ्याच दुकानातील काटे प्रमाणित नाही. शिवाय शासनालाही महसूल मिळत नाही. या अप्रमाणित काट्यांमुळे ग्राहकांना फटका सहन करावा लागत आहे.