शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांनी स्पर्धा करून उत्कृष्ट उद्योजक बनावे

By admin | Updated: August 27, 2016 00:22 IST

बचत गटांनी बाजारपेठेतील उत्पादकाशी स्पर्धा करून लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्कृष्ट उद्योजक बनावे.

शैलेश नवाल : वस्त्रोद्योग व शिवणकाम कार्यशाळावर्धा : बचत गटांनी बाजारपेठेतील उत्पादकाशी स्पर्धा करून लघु उद्योग निर्माण करावा व केवळ पैशाची देवाण घेवाण न करता उत्कृष्ट उद्योजक बनावे. यासाठी त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला शासनाच्यावतीने बाजार पेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच उद्योगाकरिता निधी सुद्धा उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी विकास भवन येथे आयोजित वस्त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेत केले. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद, माविम व कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प यांच्यावतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वस्त्रोद्योग व शिवनकाम कार्यशाळेच्या कार्यक्रमाला कृषी समृद्धी कृषी विकास प्रकल्प (केम) चे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, जिल्हा परिषदचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आजनकर, नाबार्डच्या व्यवस्थापक बन्सोड, रितेश ताजने, माविमच्या जिल्हा व्यवस्थापक दारोडकर, देवकुमार कांबळे, कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निलेश वावरे, प्रवीण जयस्वाल व मिलिंद भगत यांची प्रमुख उपस्थित होती.यावेळी शैलेश नवाल म्हणाले, बचत गटांनी आपला कायमस्वरूपी उदरनिर्वाह चालविण्यासाठी शेती, दाल मिल, घरगुती कापड उद्योग यासारखे उद्योग सुरू करून रोजगार निर्मिती करून कुशल उद्योग सुरू करावे. यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आपला उद्योग सुरू करावा व बाजारपेठेत आपल्या बचत गटाची ओळख निर्माण करावी. बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला शहरातील मध्यभागी दुकाणे सुरू करून कमीशनवर विकण्यास प्रयत्न करण्यात येईल. गटांनी शेतीवर आधारित आधुनिक उपकरणे खरेदी करून शेकऱ्यांना भाडे तत्वावर द्यावी. या उपकरणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यास मदत होईल. बचत गटांना आर्थिक लाभ होऊन बचत गट सक्षम होण्यास मदत होईल. तसेच बाजारपेठेतील उत्पादनांशी स्पर्धा करून या स्पर्धेत उतरायला पाहिजे, असेही ते म्हणाले.प्रमोद पवार म्हणाले, बचत गटांनी बाजारपेठमध्ये ज्या वस्तूची जास्त मागणी असले त्याच वस्तूचे उत्पादन करावे. जेणेकरून गटाच्या उत्पादित मालाला भाव मिळून गटाचे आर्थिक उत्पन्न वाढेल पर्यायाने गट सक्षम होईल, तसेच कंपनीच्या मालाशी स्पर्धा करून कमी दरात मालाची विक्री केल्यास जास्त प्रमाणात बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. यावेळी कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प(केम)च्या वतीने प्रकाशित यशोगाथा या पुस्तिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी केमचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी व इतर मान्यवरांनी बचत गटाच्या महिलांना उद्योग सुरू करण्याविषयी मार्गदर्शन केले.(प्रतिनिधी)