शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
5
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
6
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
7
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
8
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
9
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
10
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
11
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
12
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
13
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
14
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
15
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
16
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
17
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
18
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
19
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
20
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक

कोळसा खाणीच्या मिळकतीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By admin | Updated: May 20, 2015 02:27 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द केलेल्या कोळसा खाणीच्या लिलावामधून दोन लाख कोटी रूपये मिळाल्याची माहिती केंद्रातील सरकार देत आहे.

वर्धा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द केलेल्या कोळसा खाणीच्या लिलावामधून दोन लाख कोटी रूपये मिळाल्याची माहिती केंद्रातील सरकार देत आहे. देशामधील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करूनच कोळसा खाणी केलेल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही यावर तितकाच अधिकार आहे. शेतकऱ्यांची अवस्था पाहता या दोन लाख कोटीपैकी एक लाख कोटी रूपये देऊन केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमुक्त करावे, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनानुसार दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांजवळ बियाणे व खतांसाठी पैसे नाही. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किमान दोन थैल्या बीटी कापूस बियाणे, एक थैली लागणारे खत तसेच एक थैली सोयाबीन बियाणे व खताचे विनामुल्य शेतपेरणी पॅकज तात्काळ द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासह केंद्र सरकारने कोळसा खाण लिलावापासून दोन लाख कोटी मिळविल्याची माहिती दिली आहे. आधीच्या सरकारने ही रक्कम बुडविल्याचा सांगण्यात येत आहे. यापूर्वीच्या सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना साठ हजार कोटी रूपयांची कर्जमाफी देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेतमालाविरोधी दराच्या धोरणामुळे व कृषी अनुदानातील घोळामुळे शेतकरी पुरता डबघाईस आलेला आहे. सततचा दुष्काळ व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकट्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर ३० हजार कोटींचे कर्ज आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे ४४४ कोटी ३३ लाख रूपये शेतीकर्ज आहे. आत्महत्याग्रस्त विदर्भातील सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे चार हजार ७६७ कोटी ३९ लाख रूपये शेतीकर्ज आहे. संपूर्ण विदर्भात ६ हजार ९८५ कोटी ८८ लाख रूपये शेतीकर्ज आहे. विदर्भासह राज्य व देशातील शेतकऱ्यांना या कोळसा लिलावांमधून मिळालेल्या दोन लाख कोटींपैकी एक लाख कोटी रूपयांचे पॅकेज देऊन संपूर्ण शेतकरी कर्जमुक्ती करावी, अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.राज्यात मागील तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. दुसरीकडे शेतमालाला उत्पादन खर्चाएवढी भाव नाही. सत्तेवर आल्यावर आता शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढी भाव देणे अशक्य असल्याचे विधान केंद्रीय मंत्री करीत असून बळीराजाला भुलथापा देण्यात येत आहे. दुसरीकडे राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे सरकारला शक्य नसल्याचे सांगतात. नव्या भूमी संपादन कायद्याद्वारे शेतकऱ्यांना लुबाडण्याचा डाव आखला जात आहे. आताच्या राज्य सरकारनेही प्रत्येकी दोन थैल्या बीटी बियाणे, एक थैली सोयाबीन बियाणे, दोन थैल्या खत हे पेरणी पॅकेज दिल्यास बळीराजाला दिलासा मिळेल. याकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली.शिष्टमंडळात समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, निळकंठ राऊत, विजय मुळे, संजय भगत, किशोर तितरे, सुरेश सातोकर, संजय म्हस्के, सुधीर पांगुळ, जयवंत भालेराव, महादेव गुरनुले, किशोर झाडे, श्याम जगताप, प्रदीप डगवार, अभय पुसदकर, संजय मानकर व आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)