शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

सामान्य पक्षी शहरी पर्यावरणाचे स्वास्थ सूचक

By admin | Updated: March 19, 2017 00:59 IST

सामान्य पक्षी हे आपल्या शहरी स्वास्थ सूचक असतात. आजच्या विकासाच्या युगात आपण पक्ष्यांची निवासस्थाने नष्ट करीत आहो.

नंदकिशोर दुधे : ‘परिसरातील पक्ष्यांच्या अभ्यास’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा वर्धा : सामान्य पक्षी हे आपल्या शहरी स्वास्थ सूचक असतात. आजच्या विकासाच्या युगात आपण पक्ष्यांची निवासस्थाने नष्ट करीत आहो. त्यामुळे पक्ष्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. पक्ष्यांचे संवर्धन व्हावे आणि पर्यावरणाचे संतुलन सांभाळले जावे. यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरणारा आहे, असे प्रतिपादन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधन सहाय्यक व मुख्य मार्गदर्शक नंदकिशोर दुधे यांनी केले. पिपरी (मेघे) येथे आयोजित ‘परिसरातील सामान्य पक्ष्यांचा अभ्यास’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला सावंगी (मेघे) रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक व पक्षी अभ्यासक डॉ. बाबाजी घेवडे, बोर व्याघ्र प्रकल्पाचे सल्लागार संजय इंगळे तिगावकर, प्राचार्य डॉ. बी. के. सोनटक्के, कृषी शाखेचे अधिष्ठाता अतुल शर्मा, पराग दांडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नंदकिशोर दुधे पुढे म्हणाले, पक्ष्यांचा अभ्यास करताना सध्याची निसर्गातील परिस्थिती, अकस्मात कमी अथवा जास्त होणारी पक्ष्यांची संख्या आदी बाबी जाणून घेत त्यामागील कारणे शोधण्याचा वैज्ञानिक पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे, असे सांगितले. त्यांनी परिसरातील पक्षी प्रजातींचा अभ्यास कसा करावा, त्याची नोंद कशी घ्यावी, या विषयीही माहिती दिली. यंदा एप्रिल, सप्टेंबर आणि जानेवारी या महिन्यात धुळे, रायगड, पुणे सिंधूदुर्ग, मुंबई, सांगली, कोल्हापूर, जवळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर व वर्धा या शहरात कॉमन बर्ड मानीटरींग करण्यात येणार आहे. यापूर्वी २०१५-१६ या वर्षात करण्यात आलेल्या अभ्यासात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये ४७ प्रजातींचे सामान्य पक्षी असल्याचे नोंद घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या ४७ सामान्य प्रजातींच्या पक्ष्यांमध्ये लालबुड्या, बुलबुल या पक्ष्यांची संख्या सर्वात जास्त असून पाईड मैना सर्वात कमी संख्येत असल्याचे यावेळी दुधे यांनी सांगितले. डॉ. घेवडे यांनी निसर्गातील पक्ष्यांचे वेगवेपण विषद करतानाच मानवाच्या आपमतलबी धोरणामुळे निसर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेले नुकसानाची भरपाई करण्यासाठी पक्षी निरीक्षकांच्या छंदातून पक्षी संवर्धनाचे ध्येय गाठता येईल, असे सांगितले. विदर्भात सध्या पक्ष्यांच्या अवैध शिकारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. होत असलेल्या अवैध शिकारीवर तात्काळ उपाययोजना करणे काळाची गरज आहे. अवैध शिकारीमुळे पक्ष्याच्या संख्येत कमालीची घट येत आहे. त्यांची निसर्गातील संख्या घटू नये यासाठी इन्व्हार्मेंन्टल रिसर्च अ‍ॅन्ड कन्झर्वेशन सोसायटीद्वारे जाळे व फासे निर्मुलन अभियान राबविण्यात यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. प्रारंभी पराग दांडगे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला शिक्षा मंडळाचे उपाध्यक्ष तथा पक्षी अभ्यासक प्रा. किशोर वानखडे, हरिष इथापे, राहुल वकारे, मोहन हांडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या आयोजनासाठी जयंत सबाने, वैभव देशमुख, कृषी महाविद्यालयातील प्रा. स्रेहल देशमुख, डॉ. विशाल धोटे, डॉ. येळणे, प्रा. राजेंद्र खर्चे, डॉ. स्वाती गायकवाड, प्रा. नेहार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)