सुधारणांकडे सतत दुर्लक्ष : शेतकऱ्यांच्या सोयींकडे कानाडोळा, शेडवर व्यापाऱ्यांचा कब्जा रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धानिधी आहे. जागाही आहे.. मात्र इच्छाशक्तीच्या अभावाने नसल्याने विकासाचे कसे धिंदवडे निघतात याचे जिवंत उदाहरण म्हणजे वर्धेची कृषी उत्पन्न बाजार समिती. सत्ताधाऱ्यांकडून येथे विकासाकरिता ठोस उपाययोजनाच आखण्यात आल्या नाही. त्यांच्या उदसिनतेचा फटका येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो आहे. येत्या काही दिवसात शेतकऱ्यांचा शेतमाल निघणे सुरू होईल. तो बाजारात येईल. त्या दृष्टीने येथील बाजार समितीत काही उपाय योजना आखण्यात आल्याचे दिसले नाही. त्यांच्या व्यवस्थेच्या नावावर केवळ तुटक्या शेडमध्ये उखडलेली फर्शी दुरूस्त करण्यात येत असल्याचे दिसून आले. बाजार समितीकडे मोठी रक्कम असताना त्यांच्याकडून येथे विकासाकरिता कुठल्याही उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे दिसून आले.व्यवस्थित शेड ना मुक्कामाची सोय. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या व्यवस्थेवर येथे यावे लागत असल्याचे वास्तव आहे. सुमारे १० एकराच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या बाजार समितीत दोन ठिकाणी शेड आहे. दोन्ही शेड शेतकऱ्यांनी खरेदीकरिता आणलेला शेतमाल ठेवण्याकरिता आहे. यातील नादुरूस्त शेड शेतकऱ्यांकरिता ठेवण्यात आला तर दुसरा नव्याने बांधलेल्या शेडवर व्यापाऱ्यांनी कब्जा केल्याचे दिसले. या शेडवर ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी आपले नाव लिहून जागाच आरक्षित केल्याचे दिसून आले आहे. शेतमाल खरेदीनंतर तो ठेवण्याकरिता येथे असलेल्या गोदामांचा कधी वापर होतो अथवा नाही, अशी अवस्था दिसून आली. टिना तुटल्या तर कुठे भिंतींना भगदाड पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाबाबात बाजार समिती किती जागरूक आहे, हे दिसून येते. पाऊस आल्यास येथे आणलेला शेतमाल ओला होण्याची शक्यता असल्याने बाजार समिती व्यवस्थापनाकडून त्याची कुठलीही व्यवस्था करण्यात आले नसल्याचे वास्तव आाहे. केवळ पाणी वाहून जाण्याकरिता नव्याने नाल्या तयार करण्यात येत असल्याचे समितीच्या उपसभापतींनी सांगितले. शेतकऱ्यांकरिता नव्या सुविधा देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकरिता असलेल्या या बाजार समितीत त्यांच्याकरिता कुठल्याही विशेष सुविधा नाही. निवडणूक होवून नवी समिती तयार झाली आहे. या समितीने येथे काही नव्या सुविधा तयार करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा केल्याची माहिती आहे. समितीकडे असलेला निधी खर्च न करता नव्या सुविधा कश्याप्रकारे देता येईल या संदर्भात चर्चा होत असल्याची माहिती आहे. येथे उत्पन्न वाढीकरिता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. वर्धा बाजार समितीने त्यांचे उत्पन्न वाढावे याकरिता मध्यंतरी आंजी (मोठी) व नेरी येथे बाजार समितीचा उपबाजार भरविण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता आंजी येथे पाच एकर जागा खरेदी करण्यात आली. येथे एक इमारतही उभारण्यात आली. आज त्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यातील फर्शी पूर्णत: उखडली असून तिथे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. आजच्या स्थितीत येथे केवळ बैलबाजार भरत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे एवढी मोठी जागा निरुपयोगी ठरत आहे. या जागेवर काही उपाययोजना आखून त्यातून बाजार समितीच्या उत्पन्न वाढीला हातभार लावता येईल, असा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या बैठकीत ठेवण्यात आल्याची माहिती आहे.नेरी परिसरात असलेल्या एका जिनिंगला कापूस खरेदी करण्याकरिता सहकार्य व्हावे याकरिता बाजार समितीने येथे जागा खरेदी करून उपबाजार सुरू केला. येथे एक इमारतही बांधण्यात आली आहे. आजघडीला ही जागा आणि ती इमारत निरूपयोगी ठरत आहे. येथे शेतकऱ्यांना लाभ होईल अशी सुविधा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. समितीचे कामकाज सांभाळणाऱ्या इमारतीचीही दैना झाल्याचे दिसून आहे. या इमारतीतील इलेक्ट्रीक फिटींग पुरती उखडली आहे. यातून एखाद्याला विजेचा धक्का लागून त्यातून काही मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. याकडे समितीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. सभापतिंचा भ्रमणध्वनी स्वीच आॅफबाजार समितीत असलेल्या व पुढे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सभापती शरद देशमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी ‘स्वीच आॅफ’ असल्याचा संदेश येत होता. यामुळे त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
उदासीनतेमुळे वर्धा बाजार समितीत असुविधा
By admin | Updated: October 4, 2015 02:49 IST