पुलगाव : गत काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. यात एकाच कुटुंबातील दोघांना डेंग्यूची लागण झाली़ यातील आठ वर्षीय बालिकेचा सोमवारी मृत्यू झाला तर भाऊ उपचार घेत आहे़ नेहा महेंद्र धनाडे (८) असे मृतक बालिकेचे नाव आहे़ या घटनेमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे़आठ दिवसांपूर्वी हिंगणघाटफैल येथील अश्विन व नेहा महेंद्र धनाडे यांना ताप आला़ यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांना दुसऱ्या दिवशी वर्धा येथे पाठविले; पण तेथे नेहाची प्रकृती गंभीर झाली़ यामुळे तिला नागपूरला पाठविण्यात आले. तपासणीत डेंग्यूची लक्षणे आढळली़ प्रकृती अत्यवस्थ झाल्याने नेहाला केअर हॉस्पिटल नागपूर येथे हलविले; पण उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला़ अश्विनची प्रकृती धोक्याबाहेर आहे़ या घटनेमुळे पालिका प्रशासनात धास्ती निर्माण झाली़ शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून अतिक्रमण हटविले़ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन रक्ताचे नमूने घेतले़ ८ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नारळवार यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)
डेंग्यूच्या आजाराने बालिकेचा मृत्यू; भावाची प्रकृती धोक्याबाहेर
By admin | Updated: September 3, 2014 23:36 IST