शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

शोषणरहित समाजाची निर्मिती हाच संविधानाचा खरा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:32 IST

भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भारतीय संविधान बदलून जुनी भेदाभेदाची व्यवस्था आणू पाहत आहे.

ठळक मुद्देबी.जी. कोळसे पाटील : ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भारतीय संविधान बदलून जुनी भेदाभेदाची व्यवस्था आणू पाहत आहे. भांडवलदार व पुरोहितशाही यांच्या युतीतून संविधानाच्या मूळ उद्देशाला धोका पोहोचविला जात आहे. शोषणरहित समाजाची निर्मिती हाच संविधानाचा खरा अर्थ आहे, असे मत सुप्रसिद्ध विचारवंत माजी न्यायमूर्ती बी.सी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारे शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख जयंती समारोहानिमित्त यशवंत महा. च्या प्रांगणात ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश देशमुख तर अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत, प्राचार्य डॉ. विलास देशमुख उपस्थित होते. न्यायमूर्ती कोळसे पाटील पूढे म्हणाले की, देशात सध्या असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असंवेदनशीलता वाढीस लागून विषमतेला पूरक अनेक प्रकार वारंवार घडताना दिसत आहे. पुरोगामी विचार संपविण्याचे कारस्थाने रचली जात असून पुरोगामी विचारवंताचा खून केला जात आहे. आपण वेळीच जागे झाला नाही व अन्यायाचा प्रतिकार केला नाही, तर देश संकटात आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.प्रा. सुरेश देशमुख म्हणाले की, भारतीय संविधानाची विशिष्ट अशी संस्कृती आहे. ही समता, स्वातंत्र्य व न्यायाची आहे. या संस्कृतीला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक भारतीयाने प्रयत्न केले पाहिजे. बापूरावजी देशमुख यांचे राजकीय कार्य व विचार त्यांनी विषद केले.प्रारंभी शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. देशमुख यांनी समाज प्रबोधनासाठी अशा परिवर्तनवादी विचारांची गरज प्रतिपादित केली. याप्रसंगी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, बा.दे. फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद देशमुख, समीर देशमुख, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. किशोर अहेर, स्वाती देशमुख, प्रतिभा निशाणे, शशांक घोडमारे, किशोर माथनकर, सुनील राऊत, प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत, प्रदीप दाते, डॉ. कासारे उपस्थित होते. संचालन डॉ. के.पी. निंबाळकर यांनी केले तर आभार सतीश राऊत यांनी मानले.१९७५ च्या आणीबाणीपेक्षा बिकट परिस्थिती१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्याला संवैधानिक आधार होता; पण विद्यमान सरकारने लोकांचे संवैधानिक अधिकार गुंडाळून ठेवत देशावर आणीबाणी लागू केल्याची बोचरी टीकाही माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केली. ज्या लोकांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता, ते आज देशावर राज्य करीत आहे. घटनेची मोडतोड करीत आहे. ज्यांचे देशाशी कमिटमेंट नाही, असे लोक नेतृत्व करीत आहे. अशा लोकांच्या माध्यमातून बहुजन समाजाला नेहमीच आणीबाणीच्या स्थितीत अडकविण्याचा प्रयत्न होतो. भीतीदायक वातावरण निर्माण केले जाते. मोदींवर टिका करणे व त्यांच्याविरूद्ध संघर्ष उभा करण्यासाठी विरोधकांतही स्वच्छ चारित्र्यांची माणसं उरलेली नसल्याची टीकाही त्यांनी केली.