शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

चौफेर संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2015 02:17 IST

जिल्ह्यात सुरू असलेली पावसाची संततधार गुरूवारी दुपारपर्यंत सुरूच होती. सकाळी जिल्ह्यातील आठही तालुक्यात १३१.८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पाच मार्गांवरील वाहतूक ठप्प : खैरी येथील शाळा बंद; धरणातून पाण्याचा विसर्ग कायमचवर्धा : जिल्ह्यात सुरू असलेली पावसाची संततधार गुरूवारी दुपारपर्यंत सुरूच होती. सकाळी जिल्ह्यातील आठही तालुक्यात १३१.८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सकाळपासून निम्न वर्धाची ३१ दारे पुन्हा उघडण्यात आली आहेत. अप्पर वर्धा धरणाची १३ दारे ८० सेमीने उघडण्यात आली. यातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे येथील पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पाण्यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यात आणखी पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाण्यामुळे काही छोट्या नाल्यांचे पाणी परत येत असल्याने बऱ्याच ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. आर्वी - वर्धा मार्गावरील मजरा येथील नाल्याला गत तीन दिवसांपासून सतत पाणी आहे. या पाण्यातून मोठी वाहने काढणे शक्य होत असली तरी लहान वाहनांची वाहतूक ठप्प आहे. याच भागातील खैरी गावाचा संपर्कही गत दोन दिवसांपासून तुटला असून येथील शाळा दोन दिवसांपासून उघडली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असून गावकऱ्यांना गावाच्या बाहेर येणे जाणे कठीण झाले आहे. येथील रुग्णही गावातच आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून शासनाने यावर मार्ग काढण्याची मागणी आहे. बुधवारी आलेल्या पावसामुळे देवळी तालुक्यातील बाभुळगाव (खोसे) येथील मुरलीधर टावरी यांच्या मालकीच्या दोन गायी बेपत्ता होत्या. त्यांचे मृतदेह आज आढळून आले. या प्रकराची माहिती तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी पंचनामा केला. या शेतकऱ्याला २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली. सततच्या पावसाने नदी नाल्यांना पूर आल्याने हिंगणघाट-सिर्सी, वर्धा-गोजी, देवळी-साटोड, वर्धमनेरी, मजरा या गावाचे मार्ग बंद झाले आहे. या गावातील बसफेऱ्याही रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाच्यावतीने दिली आहे. सतत आलेल्या या पावसामुळे देवळी तालुक्यातील पुलगाव येथील एक घर पडल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. यात एक इसम जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. आकोली येथील मनोहर गोमासे यांच्या तर वायगाव (निपाणी) येथील शांताबाई कवडू भोरे यांच्या घराची भिंत कोसळली. यात त्यांचे नूुकसान झाले. दोन्ही घटनेत पंचनामा करण्यात आला. निम्न वर्धाचे सर्व ३१ दरवाजे दुसऱ्यांदा उघडलेगुरुवारी सकाळपासून आर्वी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील बाकळी, वर्धा, आड नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. आर्वी तालुक्यातील निम्नवर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे गुरुवारी दुसऱ्यांदा उघडले आहे. या सर्व दारांतून ४० से.मी. ने ५७० क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. गत आठवड्यात या निम्न वर्धाची दारे १० से.मी. ने उघडण्यात आली होती. लगेच दुसऱ्याच आठवड्यात या डॅमचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आल्याने तालुक्यातील बाकळी, आडनदी, वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाची संततधार अशीच सुरू तालुक्यात दुसऱ्यांदा पूरसदृष्य स्थिती निर्माण होणार असल्याचे एकूण चित्र आहे. चार दिवसांपासून खैरीची शाळा बंदसोमवार रात्रीपासून पुलावर पाणी वाहत आहे. ते आजही सुरूच आहे. सततच्या पाऊस सरींमुळे जलस्तर वाढीवर आहे. यामुळे येथील शाळा बंद आहे. याची माहिती मात्र येथील शिक्षकांनी शिक्षण विभागापासून दडवून ठेवली असल्याचे समोर आले आहे.सततच्या पावसामुळे सेलू येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाला गळती लागल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. जलाशयातून पाण्याचा विसर्ग धाम प्रकल्पातून ६२ सेमी उंचीवरून सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू असून २१४.४९ क्युमेक्सने पाणी सुरू आहे. पंचधारा प्रकल्पातून १५ सेमी उंचीवरून १२.७० क्युमेक्सने तर मदन उन्नई धरण १५ सेमीने १६.२० क्युमेक्सने, वर्धा कार नदी प्रकल्प ५२ सेमीने १३९.९५ क्युमेक्स आणि सुकळी लघु प्रकल्पातून १४ सेमीने २४.४४ क्युमेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. जिल्ह्यात गत महिन्यात दडी मारलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यात दमदार वापसी केली. जिल्ह्यात आतापर्यंत ५,२५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर या पावसामुळे पातळी घसरलेल्या धरणांची पातळीही बऱ्यापैकी वाढली असल्याचे दिसून आले आहे. यातून विसर्गही सुरू आहे.