लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहे. मात्र, यामुळे मद्य शौकिनांची चांगलीच पंचाईत झाली आहे. दारूसाठी दारोदार भटकत असलेल्या शौकिनांनी चक्क आरती चौक परिसरात असलेला राज्य उत्पादन शुल्काच्या मालखान्यातच चोरी करीत दारूसाठा चोरून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी चौघांनाही अटक करीत त्यांच्याकडून दुचाकीसह एक लाख ३० हजार ६०० रूपयांचा दारूसाठा जप्त केला.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मद्यपींना शहरात दारूसाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील आरती चौक परिसरात राज्य उत्पादन शुल्काकडून जप्त करण्यात आलेली दारू ठेवण्यासाठी मालखाना आहे. मद्यपींनी त्या मालखान्याचे टिन वाकवून आत प्रवेश करीत ३० हजारांचा विदेशी दारूसाठा चोरून नेला. मालखान्याचे रक्षक हरिदास सुरजुसे यांना काही युवक अंधारात लपून असलेले दिसून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी उत्पादन शुल्काचा मालखाना गाठून पाहणी केली असता नीलेश छोटेलाल फुलहार रा. रामनगर, मनोज महादेव उईके रा. गजानन नगर, सुनील उर्फ नागसेन ईश्वर वनकर रा. म्हसाळा, बबलू उर्फ रविकांत जयप्रकाश ठाकूर रा. म्हसाळा यांना अटक केली. त्यांच्याकडून एम.एच. ३२ ए. बी.६९३५ आणि एम. एच. ३२ जे. ९९७० क्रमांकाच्या दुचाकीसह दारूसाठा जप्त केला.
मद्यपींचा दारूच्या मालखान्यावर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मद्यपींना शहरात दारूसाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील आरती चौक परिसरात राज्य उत्पादन शुल्काकडून जप्त करण्यात आलेली दारू ठेवण्यासाठी मालखाना आहे. मद्यपींनी त्या मालखान्याचे टिन वाकवून आत प्रवेश करीत ३० हजारांचा विदेशी दारूसाठा चोरून नेला.
मद्यपींचा दारूच्या मालखान्यावर दरोडा
ठळक मुद्देचौघांना अटक : एक लाख ३० हजारांचा दारूसाठा जप्त