शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

अकोल्याची कृतिका स्वरवैदर्भीची विजेती

By admin | Updated: September 1, 2014 23:48 IST

सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ‘स्वरवैदर्भी-गीतगुलजार’ विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा घेण्यात आली़ या स्पर्धेचे विजेतेपद अकोल्याच्या कृतिका

वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ‘स्वरवैदर्भी-गीतगुलजार’ विदर्भस्तरीय सिनेगीत गायन स्पर्धा घेण्यात आली़ या स्पर्धेचे विजेतेपद अकोल्याच्या कृतिका बोरकर हिने पटकाविले़ द्वितीय पुरस्कार रसिका बोरकर, अकोला हिला प्राप्त झाला तर तृतीय पुरस्काराची मानकरी चंद्रपूरची समृद्धी इंगळे ठरली.विद्यापीठाच्या सभागृहात पार पडलेल्या महाअंतिम स्पर्धेतील विजेत्यांना कुलपती दत्ता मेघे, आ. अशोक शिंदे, काशिनाथ मिश्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला सांस्कृतिक महोत्सव संयोजक डॉ. राजीव बोरले, स्वरवैदर्भीचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, सुनील रहाटे, परीक्षक सीमा घारे दामले (मुंबई), सुरेंद्र दफ्तरी, अरुण सुरजूसे, सूरमणी वसंत जळीत, डॉ. प्रियंका निरंजने यांची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भातील ९५ गायकांतून निवडण्यात आलेल्या ११ युवा गायक, गायिकांनी गीतगुलजार, मेरी पसंद आणि मराठमोळी गाणी अशा तीन फेऱ्यांमध्ये एकापेक्षा एक सरस दर्जेदार गाणी सादर केली. चुरशीच्या या स्पर्धेत कृतिका बोरकर हिला प्रथम पुरस्कार, रसिका बोरकर हिला द्वितीय पुरस्कार आणि समृद्धी इंगळे हिला तृतीय पुरस्कार स्वरवैदर्भी सन्मानचिन्ह व मानपत्रासह प्रदान करण्यात आला. मुकुंद सूर्यवंशी अमरावती, ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे अकोला, उझ्मा शेख, ऐश्वर्या नागराजन, कैवल्य केजकर नागपूर, अनिल भालेराव, अस्मिता काळे आणि स्वामिनी सुभेदार यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले़ यावेळी कुलपती दत्ता मेघे यांनी गायकांना वैयक्तिक स्तरावरही रोख पुरस्कार देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. विदर्भातील प्रतिभावंतांना देशपातळीवर नावलौकिक प्राप्त व्हावा, यासाठी आपल्या संस्थेद्वारे नेहमीच प्रयत्न राहतील, अशी ग्वाही यावेळी दत्ता मेघे यांनी दिली. प्रारंभी संस्थेच्या विश्वस्त शालिनी मेघे, मुख्य समन्वयक डॉ. एस.एस़ पटेल, अभ्यूदय मेघे व परीक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. संचालन मिथिला पानसे यांनी केले. गायकांना शैलेश जगताप (संवादिनी), चारू साळवे व सचिन गुढे (आॅर्गन), राजेंद्र झाडे (आॅक्टोपॅड), दिनेश गवळी (तबला) व हितेश गुजर (गिटार) यांनी संगीतसाथ केली. कार्यक्रमाला राजेश सव्वालाखे, संगीता इंगळे, अभय जारोंडे, अफसर पठाण, रवी ढोबळे, राजू राजूरकर, वसंत वाले, नीलेश ठाकरे आदींनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)