शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४३ टक्केच पेरण्या

By admin | Updated: June 30, 2015 02:42 IST

मान्सूनच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाचे आगमण होताच पेरण्याच्या कामांना वेग आला. असे

दीड लाखावर कपाशी : ६२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा वर्धा: मान्सूनच्या प्रतीक्षेत जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाचे आगमण होताच पेरण्याच्या कामांना वेग आला. असे असले गत आठवड्यापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे टाळल्याचे कृषी विभागाच्यावतीने गुरुवारपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पेरण्या झाल्याची नोंद यात आहे. सोयाबीनच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ असल्याने त्यांच्याकडून कपाशीची लागवड जोरात सुरू असल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ४९ हजार ५१५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. त्याची टक्केवारी ६२ आहे. तर ६१ हजार ३४१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. याची टक्केवारी ५५ टक्के आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यात निम्मी पेरणी शिल्लक असल्याचे दिसते. जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केला. आलेला पाऊस पेरणीयोग्य असल्याने पेरा पूर्ण होईल असे वाटत होते; मात्र तसे झाले नाही. जून महिना संपण्याच्या मार्गावर आला असताना अद्यापही पूर्णत: पेरा झाला नसल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षनानंतरच्या चार दिवसात आणखी किती पेरा झाला याची माहिती त्यांच्याकडे आली नाही.(प्रतिनिधी)कृषी विभागाकडे नोंद झालेल्या पेरणीनुसार जिल्ह्यात सोयाबीनच्या पेऱ्याकडे शेतकऱ्यांनी अद्यापही पाठ असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनच्या पेऱ्याची टक्केवारी ५५ असल्याचे दिसून आले आहे. यामुळे नियोजनाच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा निम्माच झाल्याचे दिसून आले आहे. याचे महत्त्वाचे कारण बेभरवशाचा पाऊस असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याचे दिसून आले आहे. त्याची टक्केवारी ६२ टक्के आहे. कपशीसोबतच शेतकऱ्यांनी तुरीची लागवडही केली. जिल्ह्यात ३१ हजार १०१ हेक्टरवर तूर लावण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ४७ आहे. या व्यतिरिक्त ज्वारी वगळता इतर कोणत्याही तालुक्यात ज्वारीचा पेरा झाल्याचे दिसून आले नाही. त्याची टक्केवारी ०.६७ एवढी आहे. पीक विमा योजनेची आज अंतिम तारीख निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांना होत असलेले नुकसान टाळण्याकरिता हवामान आधारित पीक विमा योजना उतरविण्यात येत आहे. या योजनेचा गत वर्षी शेतकऱ्यांना लाभ झाला होता. त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली होती. या योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. या योजनेची अंतिम तारीख मंगळवार (३० जून ) आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.