शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहा ठिकाणच्या धाडीत ३५ जुगाऱ्यांना अटक

By admin | Updated: August 27, 2014 23:47 IST

पोळ्याच्या पर्वावर भरविण्यात आलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकून ३४ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई कारंजा, समुद्रपूर व देवळी

वर्धा : पोळ्याच्या पर्वावर भरविण्यात आलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकून ३४ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई कारंजा, समुद्रपूर व देवळी पोलिसांनी वेगवेगळ्या सहा ठिकाणी केली़कारंजा पोलिसांनी तीन ठिकाणी धाड टाकून २१ जुगाऱ्यांना अटक केली़ यात ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ कारंजा येथील वॉर्ड क्ऱ ६ मध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता धाड टाकून ९ जणांना ताब्यात घेतले़ यात १६ हजार ६१० रोख, ९ मोबाईल, ताशपत्ते असा २९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ यात आशिष रामभरण जयस्वाल, स्वप्नील सुभाष जयस्वाल, मंगेश संतोष बोडखे, प्रतिक रमेश मस्के, शेख शब्बीर शेख हमीम, हितेश मधुकर मोरे, शेख जमील शेख अमिन, कार्तिक दिलीप जसानी, प्रशांत सोपन भिंगारे यांना अटक करण्यात आली़ हेटीकुंडी येथे दोन ठिकाणी धाड टाकून ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ यात जुगार खेळताना प्रदीपसिंग बिसलसिंग अद्रणे, अनिल केशव बारंगे, गजेंद्र मारोतराव दाखेकर, राजेंद्र नत्थूजी बन्सोड, सुरेश भाऊराव धंडाळे, आशीष केशवराव शेंडे, प्रफूल भगवान बारंगे, रोषण खवशी, मोहन चंफत कातलाम सर्व रा. हेटीकुंडी यांना अटक करण्यात आली़ ही कारवाई ठाणेदार उकंडे, सचिन रोकडे, प्रकाश मेश्राम, राधेश्याम टेंभरे, मनीष कांबळे, अमोल बरडे यांनी केली़ समुद्रपूर येथे सहा अटकेतसमुद्रपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगार खेळताना सहा जणांना अटक करण्यात आली. यात विजय देवराव मसराम, रुपराव ढोबळे, अमीत भिंगरे, सुरेश कन्हेरे, गजानन नाकाडे, गजानन राऊत रा़ राळेगाव यांचा समावेश आहे़ त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ यात २ हजार १०० रुपये रोख व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.वायगाव (नि़) येथे आठ अटकेतदेवळी पोलिसांनी वायगाव (नि़) येथे धाड टाकून दोन ठिकाणाहून आठ जुगाऱ्यांना अटक केली़ ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली़ पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमीत सुधाकर नभरावे, अतूल रामकृष्ण उमरे, अंकूश ज्ञानेश्वर दिवे, विजय मारोतराव घनमोडे यांना अटक करण्यात आली़ त्यांच्याकडून १ हजार २०५ रुपये रोख जप्त करण्यात आले़ दुसऱ्या कारवाईत सुरेंद्र सोनपितळे, आशिष मधुकर डवले, अखिल प्रकाश गोटे व मंगेश आटे यांना अट केली़ यात १ हजार २७५ रुपये जप्त करण्यात आले़ ही कारवाई ठाणेदारांच्या मार्गर्शनात शशिकांत जयस्वाल, अरुण जिकार यांनी केली़(लोकमत न्यूज नेटवर्क)