शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

आज ठरणार मिनीमंत्रालयाचा २४ वा अध्यक्ष

By admin | Updated: March 21, 2017 01:10 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या २४ व्या अध्यक्षाची निवड मंगळवारी दि.२१ मार्च रोजी होणार आहे.

उपाध्यक्षपदाबाबत गुप्तता : दिवसभर बोर परिसरात भाजपाच्या वरिष्ठांच्या बैठकांचे सत्र वर्धा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या २४ व्या अध्यक्षाची निवड मंगळवारी दि.२१ मार्च रोजी होणार आहे. याचवेळी उपाध्यक्षाचीही निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील सावली(वाघ) गटाचे उमेदवार नितीन मडावी यांचे नाव आघाडीवर असून उपाध्यक्षपदावर आर्वीचा दावा असला तरी देवळी व वर्धा विधानसभा मतदार संघही डोळा ठेवून असल्याने कमालीची गुप्तता पाळली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा वासीयांनी भाजपला एकतर्फी बहुमत दिले. जिल्हा परिषदेत भाजपाचे ३१ सदस्य आहेत. यामुळे कोणत्याही युतीची गरज नाही. अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरूष किंवा महिलेकरिता राखीव आहे. या प्रवर्गातील भाजपाकडे चार उमेदवार आहेत. यात हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) गटातील नितीन मडावी, देवळी तालुक्यातील गौळ गटातील मयुरी मसराम, वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) येथील सरस्वती मडावी आणि तालुक्यातील ठाणेगाव गटातील निता गजाम यांचा समावेश आहे. या चार उमेदवारापैकी लाल दिवा कोणाला द्यावा या संदर्भात दिवसभर भाजपाच्या वरिष्ठांत बैठकीच्या फैरी झडत आहे. चार पैकी एक उमेदवार खासदराच्या तालुक्यातील आहे तर दोन उमेदवार आमदारांच्या तालुक्यातील आहेत. तर चवथा उमेदवार माजी आमदारांच्या तालुक्यातील आहे. यामुळे प्रत्येकाकडून लालदिवा आपल्याला मिळावा याकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. या संदर्भात भाजपाच्या वरिष्ठांच्या दिवसभर बैठका सुरू असल्याचे दिसून आले. यात अध्यक्षपदावर हिंगणघाट तालुक्याचा दावा मजबूत असल्याचे संकेत आहे. तर उपाध्यक्षपद आर्वी तालुक्यात जाण्याचे संकेत आहेत. मात्र अंतिम निर्णय मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीतूनच कळणार आहे. याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.(प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळपासून प्रक्रीयाअध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सकाळी १० वाजता जि.प.च्या सभागृहात प्रारंभ होईल. ही प्रक्रीया दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण होईल. या काळातच अर्ज सादर करणे, तो परत घेणे आणि मतदानाची प्रक्रीया पूर्ण होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी संजय दैने तर सहायक म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी घनश्याम भुगावकर काम पाहतील.नितीन मडावी यांचे पारडे जडजिल्हा परिषदेचे २४ वे अध्यक्ष म्हणून हिंगणघाट तालुक्यातील सावली (वाघ) गटाचे नितीन मडावी यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघालाच अध्यक्षपद मिळावे, यासाठी आ. समीर कुणावार आग्रही असल्याचे समजते. उपाध्यक्षपदाबाबत भाजपश्रेष्ठींनी कमालीची गुप्तता पाळली आहे.भाजपाला तिसऱ्यांदा अध्यक्षपद वर्धा जिल्हा परिषदेत आतापर्यंत २३ पैकी १७ वेळा अध्यक्षपद काँग्रेसने भुषविले, तर भाजपने दोनदा. मार्च १९९८ ते मार्च १९९९ या काळात पहिल्यांदा अध्यक्षपद मिळाले होते. यानंतर सप्टेंबर २०१४ ते मार्च २०१७.आता तिसऱ्यांदा भाजपाला अध्यक्षपद मिळणार आहे. चारदा सीईओंकडे प्रभार होता.