शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

२२ हजार लिटर दुधाची निर्यात

By admin | Updated: September 7, 2015 01:59 IST

जिल्ह्यात कच्चा दुधाचे दिवसाला ५४ हजार लिटरच्या घरात संकलन होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात दुधाची दिवसाला असलेली मागणी ३२ हजार लिटर आहे.

दिवसाला ५४ हजार लिटर उत्पादन : जिल्ह्यात वाहते दूधगंगाश्रेया केने  वर्धा जिल्ह्यात कच्चा दुधाचे दिवसाला ५४ हजार लिटरच्या घरात संकलन होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात दुधाची दिवसाला असलेली मागणी ३२ हजार लिटर आहे. त्यामुळे उर्वरित २२ हजार लिटरची परजिल्ह्यात निर्यात केली जात आहे. दुधाचे विक्रमी उत्पन्न होत असताना दुधावर प्रक्रिया करून त्यापासून पदार्थ निर्मिती उद्योगाची मात्र येथे वाणवा आहे. त्यामुळे जिल्ह्यातून निर्यात होत असलेल्या दुधावर प्रक्रिया करून निर्मित उत्पादनाची येथे आवक होत आहे.वर्धा तालुक्यापर्यंत मर्यादित असलेल्या गोरस भंडार संस्थेच्या माध्यमातून दुधाचे संकलन व दुग्ध उत्पादनाची निर्मिती होते. मात्र जिल्ह्यात अन्यत्र याप्रकारे दुग्ध उत्पादन होत नसल्याचे दिसते. याशिवाय जिल्ह्यात ग्रामीण भागात स्थापन केलेले दुग्ध संकलन केंद्र प्रशासकीय उदासिनतेमुळे बंद झाले आहे. तर मोजकेच केंद्र यात तग धरून आहे. त्यामुळे दुधाचे विक्रमी उत्पन्न होवूनही त्याचा उपयुक्त वापर करण्यासाठी येथे यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे दिसून येते. अशी यंत्रणा उभारण्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. तसेच पशुधन विक्रीला काढण्याची वेळ गोपालकांवर येणार नाही.जिल्ह्यात शासकीय, खासगी, सहकारी संस्थांकडून दिवसाला ५४ हजार लिटर दुधाचे संकलन होते. ३४ हजार लिटर दुधाची मागणी असून उर्वरित २२ हजार लिटर दूध नागपूर, अमरावती जिल्ह्यात निर्यात केले जाते. दूध संकलन करणाऱ्या १०८ संस्था येथे आहेत. याशिवाय नोंद नसलेल्या दूध संकलन केंद्रावरही २० ते २५ हजार लिटरच्या जवळपास कच्चे दूध संकलित होते. जिल्ह्यात दुधाळू जनावरांची संख्या १ लाख ३० हजाराच्या घरात आहे.१.३० लाख दुधाळू जनावरे जिल्ह्यात १ लाख ३० हजाराच्या जवळपास दुधाळू जनावरांची संख्या आहे. तसेच ५४ हजार लिटर दिवसाला दुधाचे उत्पन्न होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात संकलनापेक्षा कमी मागणी आहे. त्यामुळे उर्वरित दुधाची जिल्ह्याबाहेर निर्यात केली जाते. या निर्यात केलेल्या दुधावर प्रक्रिया करून खवा, पनीर असे विविध उत्पादन तयार करून जिल्ह्यात आयात होते.दूध उत्पन्नात वर्धा तालुका अव्वलदुधाच्या उत्पन्नात जिल्ह्यात वर्धा तालुका अव्वलस्थानी आहे. वर्धा तालुक्यात दिवसाला १८ हजार लिटर कच्च्या दुधाचे संकलन केले जाते. शिवाय गोरस भंडार या सहकारी तत्त्वावर आधारित संस्थेच्या माध्यमातून दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थाची निर्मिती केली जाते. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना नियमित आवक होते. शिवाय येथील उत्पादनांनी देशभरात लोकप्रियता मिळविली आहे.जिल्ह्यात १०८ मान्यताप्राप्त दूध संकलन केंद्र व संस्था आहे. या माध्यमातून दिवसाला होणाऱ्या दुधाच्या उत्पादनाची नोंद केली जाते. मात्र दुधाच्या चंदी, मिठाईकरिता होत असलेली परस्पर दुधाची विक्री, स्थानिक पातळीवर दुधाची होणारी परस्पर निर्यात याची नोंद कुठेच होत नसल्याचे दिसते. शिवाय अशी नोंद ठेवणारी कोणतीच संस्था अथवा यंत्रणा येथे नाही. त्यामुळे या उत्पादनाचा किंवा निर्मितीचा कुठेही उल्लेख होत नसतो. यावर कुणाचाही देखरेख नसल्याने प्रत्यक्षात नोंद होत असलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक दुधाचे संकलन जिल्ह्यात होत असल्याची बाब समोर येते.