शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भाजीपाला गडगडला!

By admin | Updated: December 30, 2016 04:06 IST

एकीकडे नोटाबंदी आणि आवक वाढल्याचा फटका भाजीबाजाराला बसल्याने भाव गडगडले आहे. या काळात बाजारात राजा समजल्या जाणाऱ्या मटाराचा भाव किलोला

मुरलीधर भवार/जान्हवी मोर्ये,  कल्याणएकीकडे नोटाबंदी आणि आवक वाढल्याचा फटका भाजीबाजाराला बसल्याने भाव गडगडले आहे. या काळात बाजारात राजा समजल्या जाणाऱ्या मटाराचा भाव किलोला १० ते १२ रुपये इतका घसरला आहे. भाव पडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असले तरी नोटाबंदीच्या पन्नास दिवसांत स्वस्त भाजीपाल्याचा एकमेव दिलासा मिळाल्याने ग्राहक खुशीत आहेत. भाजीपाल्याचे भावही सतत गडगडत गेल्याने बाजाराला हुडहुडी भरल्याची स्थिती कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दिसून येते.भाजीपाल्याचे व्यापारी मोहन नाईक यांनी सांगितले, बाजारात भाजीपाल्याचा राजा म्हणून मटाराची ओळख आहे. एरवी बाजार गरम असल्यावर या हिरव्या वाटाण्याला १०० रुपये किलोचा भाव मिळतो. आत्ता तो किलोला १० ते १२ रुपये दराने विकला जात आहे. हा वाटाणा मध्य प्रदेशातून येतो. एक पोते वाटाणा खुडण्यासाठी एक महिला २५० ते ३०० रुपये घेते. शेतकऱ्याला जागेवर वाटाण्याला किमान १८ ते २० रुपये किलोचा भाव मिळणे अपेक्षित आहे. पण त्याचा बाजार घसरल्याने शेतकऱ्याला जागेवर किलोमागे पाच रुपयांचा भाव मिळतो आहे. नोटाबंदीचा सगळ््यात जास्त फटका भाजी व्यापाराला बसला आहे, असा तपशील देऊन ते म्हणाले, रोख पैसे नसल्याने व्यापारी बाजारात माल खरेदीसाठी जात नाहीत. शेतकरी पिकविलेला भाजीपाला न विकताच तसेच सोडून जात आहेत, इतकी भीषण परिस्थिती आहे. काही शेतकरी पिकविलेला माल फेकून देण्याऐवजी किरकोळ भावात विकून घरचा रस्ता गाठतात. उत्पादन खर्चही निघत नाही. चांगली थंडी पडली. दव पडले; तर उत्पादन चांगले होते. आता उत्पादन चांगले आहे. आवक चांगली आहे, पण मालाला भाव नाही. एका पोत्याची म्हणजेच बारदानाची किंमत २० रुपये आहे. रिकाम़्या बारदानाला २० रुपये आणि आतील मालाला किलोला १२ रुपये ही परिस्थितीच बाजाराचे व्यस्त आणि विषण्ण करणारे चित्र दाखविणारी आहे. वांगी, मिरची, कोबीही घसरलामटाराप्रमाणेच इतर भाज्यांचेही भाव गडगडले आहेत. वांगी ५० रुपयांना १५ किलो, सिमला मिरची ८ ते १० रुपये किलो, फ्लॉवर चार ते पाच रुपये किलो, कोबी पाच रुपये किलो, गवार व भेंडीची फारशी आवक नाही, अशी स्थिती आहे. कांदा-बटाटा ६ ते ७ रुपये किलोने विकला जात आहे. गवार-भेंडीची आवक घटली आहे. कल्याणमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजी-पाल्यालाही सध्या फारसा भाव नाही. टोमॅटोची २५ किलोची जाळी १०० ते १२५ रुपये दराने विकली जात आहे. टोमॅटोला दहा रुपयांला दोन किलो असा दर आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी ट्रकच्या ट्रक माल फेकून देत आहेत. ग्राहकांची चंगळबाजारात मटाराचे रोज १० ते १५ ट्रक येतात. एका ट्रकमध्ये ९ टन मटार असतो. किमान ९० टन व कमाल १३५ टन हिरवा वाटाणा येतो. त्याला उठाव नाही. त्यामुळे भाव पडला आहे. पण ग्राहकांची चंगळ झाली आहे. थेट भाजीपाला विक्री केंद्रेबाजारात मालाची आवक वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर २० ते २५ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकाला स्वस्त दरात भाजी मिळते आहे. बचत गटाच्या माध्यमातून थेट भाजीपाला विक्री केंद्रे कल्याण परिसरात सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्राहकाचा थेट फायदा होणार आहे, असे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.डोंबिवलीतही भाज्या स्वस्तडोंबिवली : थंडीमुळे भाजीपाल्याची आवक वाढल्याने डोंबिवलीतही भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहेत. नोटाबंदीचा फटका बाजाराला बसल्याचे प्रत्यक्ष फेरफटका मारल्यावर दिसून येते. आवक अशीच वाढत राहिली, तर तरी भाज्यांचे दर आणखी कमी होतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. सध्या भाज्यांचे दर २० ते २५ टक्के कमी झाल्याची माहिती भाजीविक्रेते अजय जाधव यांनी दिली. भाज्या आधीचे दर आताचे दर कोबी ४०-६०२०फ्लॉवर४५-५०२०वांगी ५०-६०२०-२५घेवडा४५१५-१६गवार ८०-९०६०-६५हिरवा वाटाणा -१५-२०पडवळ५०-६०३०-४०हिरवी मिरची ४०१८-२०सिमला मिरची ४०-५०२०-२५भेंडी८०५०-६०लाल भोपळा ३०१०-१२तोंडली७०-८०४०दोडका६०-६५४०-४८टोमॅटो ५०-६०१०गाजर-२०-२५कारली६०-६५५०काकडी४०-५०दुधी६०-६५४० दर किलोचे आहेत.(हे दर डोंबिवलीच्या किरकोळ बाजारातील आहेत.)