शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

खासगी रुग्णालयाने केली तीन लाख ५८ हजारांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केलेल्या कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयाने तीन लाख ५८ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केलेल्या कल्याण पूर्वेतील एका खासगी रुग्णालयाने तीन लाख ५८ हजार रुपयांची वीजचोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग १ आणि भरारी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत ही वीजचोरी उघड झाली आहे. चोरीच्या विजेचे देयक व दंडाची रक्कम भरण्याबाबत या रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्यास वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी आवश्यक फिर्याद देण्यात येणार असल्याचे महावितरणने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.

रुग्णालयाचे नऊ लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. थकीत वीज बिलाचा भरणा करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही रुग्णालयाने बिलाचा भरणा केला नाही. उलट पूर्वीच्या जुन्या नावाने रुग्णालय सुरू असल्याचे आढळून आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, रुग्णालयाची वीज जनरेटरवर सुरू असल्याचे दर्शविण्यात आले. सलग १५ दिवस पाळत ठेवल्यानंतर रुग्णालयाची बनवाबनवी उघडकीस आली. महावितरणरचे कर्मचारी रुग्णालयात तपासणीला आले की जनरेटरचा वापर व इतर वेळी विजेचा चोरटा वापर होत असल्याचे संयुक्त कारवाईत उघड झाले.

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल व अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्व उपविभाग १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते व अमोल उके, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी अतुल ओहळ, सहायक अभियंता किरण इमाळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दंड भरण्याची नोटीस

एप्रिल ते जून २०२१ या कालावधीत या रुग्णालयाने तीन लाख ५८ हजार ३०० रुपये किमतीच्या ११ हजार पाच युनिट विजेचा चोरटा वापर केल्याचे निष्पन्न झाले. चोरीच्या विजेचे तीन लाख ५८ हजार व एक लाख ४५ हजार रुपये दंड भरण्याची नोटीस रुग्णालयास बजावण्यात आली आहे.

------------------