शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीसाठी पालिकेकडे पर्यायी व्यवस्था नाही

By admin | Updated: February 4, 2016 02:31 IST

शहराला स्टेमच्या पाणीकपातीतून वगळल्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याची बोंब उठल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने शहरालाही पुनश्च कपात लागू केली आहे

राजू काळे,  भार्इंदरशहराला स्टेमच्या पाणीकपातीतून वगळल्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याची बोंब उठल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने शहरालाही पुनश्च कपात लागू केली आहे. या कपातीदरम्यान पालिकेकडे पाणीपुरवठ्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. मात्र, ज्यांना टँकरचे पाणी मंजूर झाले आहे, त्यांच्याखेरीज इतरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शहराला स्वत:चा पाण्याचा स्रोत नसल्याने केवळ शासकीय कोट्यावर अवलंबून राहावे लागते. स्टेम व एमआयडीसीकडून एकूण १३६ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत असला तरी तो लोकसंख्येला अपुरा आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणाहून शहर सुमारे ४५ किमी अंतरावर शेवटच्या टोकाला असल्याने दोन पाणीपुरवठ्यातील अंतर ५० ते ७० तासांवर जात आहे. यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणच्या रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. स्टेमच्या शिथिल कपातीसह एमआयडीसीची बुधवार व गुरुवारऐवजी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी, रविवारी कपात लागू झाली.उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा सलग दोन दिवस बंद राहणार असून पालिकेने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था केली नसल्याने हाहाकार उडण्याची शक्यता शहरात निर्माण झाली आहे. हातपंप व विंधन विहिरी दुरुस्त करण्याचे काम कागदावर असून सेना नगरसेवक रमेश चव्हाण, सुभाष मनसुलकर, राजश्री चौधरी आदी नगरसेवकांनी स्वत: पदरमोड करून प्रभागातील नागरिकांसाठी बोअरवेल खोदल्या आहेत.उल्हासनगर महापालिका पाण्यासाठी संपूर्णत: एमआयडीसीवर अवलंबून आहे. शहराला दररोज ११५ ते १२० एमएलडी पाणीपुरवठा होत असून पूर्वेला पाले व जांभूळ गावच्या जलकुंभांतून ३८ तर पश्चिम भागाला शहाड जलकुंभातून ७८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाटबंधारे विभागाने ३० टक्के पाणीकपात करताच तीव्र पाणीटंचाई शहरात निर्माण झाली असून वेळीच पर्यायी व्यवस्था पालिकेने केली नाही. यापूर्वी पूर्व भागात गुरुवारी व शुक्रवारी असे सलग दोन दिवस तर पश्चिमेला मंगळवार व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद केला जात होता. आता शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस पाणी बंद राहणार असल्याचे प्रसिद्धिपत्रक पालिकेने काढल्याची माहिती कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी दिली.च्शहरातील कंवाराम चौक, ओटी सेक्शन, सुभाष टेकडी परिसर, नागसेननगर, दहाचाळ, महात्मा फुले कॉलनी, संतोषनगर, भीमनगर, मद्रासीपाडा, तानाजीनगर, भय्यासाहेब आंबेडकरनगर, रमाबाई आंबेडकरनगर, प्रेमनगर टेकडी परिसर, संभाजी चौक आदी परिसरांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.च्या विभागातून शेकडो नागरिक दररोज पालिकेवर धडकून पाणीपुरवठ्याची मागणी करीत आहेत.च् सोमवार, मंगळवारी नागरिकांनी पालिकेवर मोर्चा आणला होता. पाणीपुरवठा अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी मोर्चा व आंदोलनाचा धसका घेतल्याने मोबाइल बंद करून ठेवले आहेत.नियोजन सोमवारच्या पाणीपुरवठ्याचेच्सलग दोन दिवस पाणी नसल्याने नागरिकांना तिसऱ्या दिवशी पाणी देणे बंधनकारक असल्याने सोमवारच्या पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. एकाच दिवशी संपूर्ण शहराला मुबलक पाणी देणे गरजेचे असल्याने सोमवारचा पाणीपुरवठा कसा करायचा आणि त्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन आखण्यात येत आहे. च्दोन दिवस पाणी नसल्याने साहजिकच नागरिक सोमवारी पाण्याची वाट पाहणार आहे. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातही वाढीव १० टक्के पाणीकपातीचा भारही उर्वरित पाच दिवसांमध्ये वर्ग केल्याने नियमित पाण्यापेक्षा कमी पाणी शहरात येईल. च्टँकरचालकांनाही जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करणार नाही. त्यामुळे टँकरचालकांचेही हाल होणार आहेत. टँकरवर अवलंबून दुर्गम भागांसाठीच पाणी दिले जाणार आहे. मात्र, जेथे नळाद्वारे पाणी येते, तेथे टँकरने पाणी न देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्र वार, दिनांक ५ फेब्रुवारीला रात्री १२ ते शनिवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत इंदिरानगर, गांधीनगर, श्रीनगर, समतानगर, टेकडी बंगला, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.शुक्र वार, दिनांक ५ फेब्रुवारीला रात्री १२ ते रविवारी रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत जेल, ऋ तुपार्क, सिद्धेश्वर, उथळसर, साकेत, महागिरी, नौपाडा, पाचपाखाडी व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे. एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार ते रविवार या कालावधीत बंद राहणार आहे. त्यानुसार कळवा, मुंब्रा भागांचा पाणीपुरवठा यापुढे शुक्रवार ते रविवारपर्यंत ४८ तास बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर मधील रूपादेवीपाडा व वागळे फायर ब्रिगेड या परिसराचा पाणीपुरवठा ४८ तास बंद राहणार आहे.लाखांच्यावर बदलापूर शहराची लोकसंख्या असून या शहरासाठी दररोज ४७ दशलक्ष लीटर पाण्याची गरज भासते. तर, अंबरनाथ शहराची लोकसंख्या २.७५ लाख असून या शहरासाठी ५५ दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याची गरज आहे. या दोन्ही शहरांना जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करत आहे. उल्हास नदीपात्रातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यावर ४० टक्के कपात लागू केल्याने पाण्याचे वितरण करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.