शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे आमचे माहेरघरच!

By admin | Updated: May 23, 2016 02:35 IST

‘ठाणे सोडून जाताना खूप वाईट वाटतंय. दीड महिना आम्ही इथे राहिलो. सर्व जण आपल्याच कुटुंबातील सदस्य वाटले. प्रत्येकाने आपलेपणा दाखवला. डोळ्यांतील अश्रू आवरेनासे झालेत.

प्रज्ञा म्हात्रे, ठाणे‘ठाणे सोडून जाताना खूप वाईट वाटतंय. दीड महिना आम्ही इथे राहिलो. सर्व जण आपल्याच कुटुंबातील सदस्य वाटले. प्रत्येकाने आपलेपणा दाखवला. डोळ्यांतील अश्रू आवरेनासे झालेत. ठाणे म्हणजे जणू काही आमचे माहेरघरच झाले आहे,’ असे भरल्या डोळ्यांनी स्वाती चव्हाण आणि नलिनी गायकवाड या सांगत होत्या. दीड महिन्यापूर्वी ठाण्यातील गावदेवी मैदानात आलेल्या या दुष्काळग्रस्त कुटुंबीयांनी आनंदाश्रूंनी निरोप दिला. दौण येथील खुटबाव गावातील दोन दुष्काळग्रस्त कुटुंबीयांना रोजगार मिळावा, या उद्देशाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी दीड महिन्यापूर्वी त्यांना ठाण्यातील गावदेवी मैदान येथे पिठलं-भाकरीचा स्टॉल सुरू करून दिला. त्या दिवसापासून प्रामाणिकपणाने या दोन कुटुंबीयांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पिठलं-भाकरीची चव केवळ ठाण्यातच नव्हे, तर डोंबिवलीकर, मुंबईकरांपर्यंत पोहोचली आणि दिवसेंदिवस या स्टॉलला प्रतिसाद वाढत गेला. जून महिना जवळ येत असल्याने त्यांनी रविवारी गावी जाण्याचे निश्चित केले आणि जाताना त्यांनी आपल्या भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. स्वाती चव्हाण आणि नलिनी गायकवाड या दोघी सांगत होत्या की, इथून जाताना माहेरहून सासरी जात असल्यासारखे वाटत आहे. सर्वांनी इतके प्रेम दिले की, पुन्हा कधी इकडे यायचे असेल तर कोणती अडचण येईल, असे वाटत नाही. कमलतार्इंनी जेव्हा शहराकडे येण्यास सांगितले, तेव्हा इथे येण्याआधी दोन दिवस खूप डोके दुखत होते. शहराकडे जायचे की नाही, हा प्रश्न सतावत होता. विचार करूनकरून डोके दुखू लागले होते. परंतु, आता हे ठाणे शहर आम्हाला घरासारखे झाले आहे. रविवारी सकाळपासून ठाणेकर भेटायला येत होते आणि तुम्ही आठ दिवस तरी थांबा, अशी विनवणी करीत होते. इकडून गावी गेल्यावर आम्हाला करमणार नाही, हे तितकेच खरे आहे. सुरुवातीला इथे आल्यावर भीती होती, धास्ती वाटायची. मध्यंतरीच्या काळात काही लोकांकडून त्रासही झाला. त्या वेळी असे वाटत होते की, नको ती भांडणे. सरळ गावी निघून जावे. परंतु, सर्वच ठाणेकर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आता आम्हाला बिनधास्त वाटतंय. इथून जाताना ठाणेकरांच्या आठवणींची शिदोरी घेऊन जात आहोत. सर्वांनी खूप जीव लावला. इतकं जवळ केलं की, आता कसलीच भीती वाटत नाही. पिठलं-भाकरी खाण्यासाठी ठाणेकरांनी कधी बोलवले, तर अर्ध्या रात्री निघणार. सकाळी ८ वाजल्यापासून ठाणेकरांची पिठलं-भाकरीसाठी रांग लागत होती. ती रात्री १२ वाजेपर्यंत असायची. पहिल्या दिवशी ज्या वेळी इथे आलो तेव्हा काय होईल, कसे होईल, असे वाटत होते. सुरुवातीचे आठ ते दहा दिवस हिशेब जमत नव्हता; परंतु ठाणेकरांनीच हिशेब करायला शिकवले. सर्वांपासून प्रेम, आदर, माया मिळाली, जी आजवर गावी कधीही मिळाली नाही. लोक इतकी जवळची झाली होती की, रोज पिठलं-भाकरी खाणारे लोक इथे येत असत. अनेक महिला स्टॉलवर येऊन कुटुंबातील ताई, माईसारख्या गप्पा मारायच्या. शहराची आम्हाला पहिल्यापासून धास्ती वाटायची, परंतु इथे आल्यावर वेगळाच अनुभव मिळाला आणि जो काही मिळाला, तो कायम मनात राहणारा आहे. एकीकडे या दीड महिन्यात ठाणेकरांनी दिलेली साथ, याबद्दल या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता, तर दुसरीकडे ठाणेकरांना सोडून जात असल्याने त्यांचे अश्रू डोळ्यांतून घळाघळा वाहत होते.