शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत रेखाकलेच्या सवलतीचे गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:43 IST

विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी : टक्केवारी वाढण्यासाठी होते मदत

- शशिकांत ठाकूरकासा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले सात ते आठ महिने शाळा आणि कॉलेजेस बंद होती. त्यामुळे यंदा   चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा  दहावीच्या मुलांना सवलतीचे  गुण मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.दरवर्षी या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांचा कलही या परीक्षेकडे जास्त असतो.  रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण ५० टक्केच्या जवळपास आहे,  मात्र ‘ए’ ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते. परीक्षेत ‘ए’ ग्रेडसाठी ७ गुण, ‘बी’ ग्रेडसाठी ५ गुण आणि ‘सी’ ग्रेडसाठी ३ गुण दिले जातात, मात्र यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ‘ए’ ग्रेड ४ ते ५ टक्के प्रमाण, तर ‘बी’ ग्रेड १५ ते २० टक्के आणि  उर्वरित ७५ ते ८० टक्के विद्यार्थ्यांना ‘सी’ ग्रेड मिळतो.  त्यामुळे  रेखाकला परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण टक्केवारी वाढण्यास मदत होते. दरम्यान, ड्रॉईंगच्या परीक्षा या दरवर्षी सप्टेंबरमध्ये होतात. यामध्ये दोन परीक्षा होत असून पहिली एलिमेंटरी आणि दुसरी इंटरमिजिएट परीक्षा होते. विद्यार्थ्यांना गुण हे दुसरी इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दिले जात असले तरी पहिली एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दुसऱ्या इंटरमिजिएट परीक्षेस बसू शकतात. रेखाकला परीक्षेत स्थिरचित्र, स्मरणचित्र, नक्षीकाम  चित्र आणि भौमितिक रचना असे चार विषय असतात. दररोज दोन पेपरप्रमाणे दोन दिवस चालणाऱ्या या परीक्षेचा निकाल जानेवारीत लागतो, मात्र कोरोनामुळे मागील  वर्षापासून या परीक्षा झाल्याच नाहीत. त्यामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना रेखाकला परीक्षेचे सवलतीचे  गुण मिळणार नाहीत.कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षापासून दोन वर्षे रेखाकला परीक्षा झालीच नाही. त्यामुळे या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत शासन स्तरावर विचार होणे आवश्यक आहे.- महेंद्र पवार,   कार्याध्यक्ष, जिल्हा कला अध्यापक संघ,  पालघरकोरोनामुळे गेल्या वर्षी व यंदाही रेखाकला परीक्षा झालीच नाही. त्यामुळे आमचे सवलतीचे गुण जाणार आहेत.- प्रणय चौरे, विद्यार्थी